नंदूरबार l प्रतिनिधी
आजच्या आधुनिक युगात मोबाईल ही काळाची गरज बनलेली असुन बरेच आर्थीक व्यवहार हे मोबाईलद्वारे किंवा ऑनलाईन पध्दतीने केले जातात , त्यामुळे वेळेची बचत होवुन वाचलेला वेळ हा विधायक व चांगल्या कामासाठी वापरु शकतो . परंतु तोच मोबाईल काही वेळेस नागरीकांच्या अडचणी वाढविण्याचे कारण ठरु शकतो .

दि. २७ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाईन सायबर पोर्टल वरील अक्कलकुवा येथील तक्रारदार यांना दि. २६ जानेवारी २०२२ रोजी घरी ते असतांना त्यांना अज्ञात इसमाचा फोन आला व इंडसइंड बँकेचे क्रेडीट कार्ड देण्याचे सांगुन व वेगवेगळ्या सुविधांचे आमिष दाखवुन त्यांना सिबिल स्कोर नावाचे ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगीतले त्या ॲप्लीकेशन मध्ये त्यांच्या ICICI बँकेचे क्रेडीट कार्ड ची माहीती भरण्यास सांगुन त्यांच्या ICICI बँकेच्या क्रेडीट कार्डमधुन २५ हजार रुपये ऑनलाईन काढुन घेवून त्यांची फसवणुक केली . तक्रारदार यांना सर्व प्रकार समजताच त्यांनी तात्काळ सायबर सेल नंदुरबार येथे संपर्क साधुन झालेल्या फसवणुक बाबत सांगुन ऑनलाईन तक्रार दाखल केली . सायबर सेल येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कर्तव्यात तत्परता दाखवत संबंधीत वॉलेट / बँकेशी तात्काळ समन्वय साधुन फसवणुक झालेली रक्कम गोठविण्याची कारवाई केली . त्यामुळे तक्रारदार यांची एकुण २५ हजार रुपयाची रक्कम वाचविण्यात यश आले . व दि.२९ जानेवारी २०२२ रोजी तक्रारदार यांच्या खात्यातुन गेलेले २५ हजार रुपये त्यांच्या खात्यात पुन्हा परत मिळवून दिले . सन २०२१ मध्ये सायबर पोलीस ठाणे नंदुरबार येथे नंदुरबार जिल्ह्यातील विविध प्रकारच्या फसवणुक झालेल्या ३० पेक्षा अधिक लोकांनी तात्काळ सायबर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल केली होती . सायबर पोलीस ठाणे नंदुरबार येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय तत्परतेने संबंधीत मोबाईल वॉलेट बँक व इतर अधिकाऱ्यांशी समन्वय साधुन तक्रारदार यांचे फसवणुक झालेले एकुण १९ लाख २८ हजार ४३७ रुपये परत मिळवून दिले . त्यामुळे त्या सर्व तक्रारदारांनी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचेसह सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व पथकाचे अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले आहे . सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक सो . नंदुरबार पी . आर . पाटील व अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रविंद्र पोलीस नाईक पंकज महाले, कन्हैया पाटील , हितेश पाटील यांच्या पथकाने केली आहे .
नंदुरबार जिल्ह्यातील एखाद्या व्यक्तीला सायबर चोरट्यांनी फसवुन त्यांचे खात्यातुन पैसे काढुन घेतल्यास तात्काळ पोलीसांकडे तक्रार करावी . तसेच तात्काळ सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते . त्यामुळे ऑनलाईन फसवणुक झाल्यास नागरीकांनी तात्काळ जवळचे पोलीस ठाणे / ऑनलाईन www.cybercrime.gov.in यावर किंवा सायबर सेल , नंदुरबार येथे संपर्क साधावा . तसेच कोणतेही अनोळखी ॲप डाऊनलोड करु नये , अज्ञात नंबरवरुन पाठविलेली लिंक उघडु नये . मोबाईलवर आलेला बँकेचा OTP शेअर करु नये . फेसबुकवर अनोळखी व्यक्तीकडुन ( विशेषत : महिलांकडुन ) आलेली Friend Request accept करु नये . यामुळे तुमची फसवणुक होवु शकते . अधिक सायबर माहीतीसाठी व जनजागृतीसाठी Twitter वर @Cyberdost या अकाउंटला Follow करणे . तसेच t.me/cyberdosti4c या टेलिग्राम ग्रुपवर जॉईंट व्हावे .असे आवाहन पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले आहे.








