नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर व तालुका कृषि अधिकारी स्वप्नील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शरद देविदास चौधरी यांच्या शेतावर शेतकर्याच्या शेतीशाळेच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षण वर्गात कृषि सहाय्यक सुनिल पवार यांनी कापूस पिकावरी मित्रकिडी आणि शत्रू किडी यांची माहीती देऊन निरीक्षणाव्दारे शेतकर्यांना किडींची ओळख करुन दिली . तसेच रस शोषन करणार्या किडींच्या नियंत्रणा करीता ५ टक्के निंबोळी अर्क घरच्या घरी कसा तयार करावा याचे प्रात्यक्षीक शेतकर्यांना करुन दाखविले व एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापन , आंतरमशागत , तन नियंत्रण , पिकांना रासायनिक खते देतांना कोणती दक्षता घ्यावी १० टक्के रासायनिक खताची बचत कशी करता येईल या बाबत शेतकर्यांना माहीती दिली . तसेच मंडळ कृषि अधिकारी विजय मोहीते यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीची प्राथमीक अवस्था , गुलाबी बोंडअळीची पतंग तसेच त्याच नियंत्रणासाठी कामगंध सापळे कसे लावावेत कोणते लूस वारावेत या विषयी माहीती दिली . या प्रसंगी कृषि सहाय्यक हेमंत लाड ,कृषी पर्यवेक्षक पी. पी.गिरासे, सुधिर वाघमारे , प्रकाश वसावे तसेच प्रगतशिल शेतकारी कांतीलाल गोविंद पटेल , नरसई लक्ष्मन पटेल , ईश्वर उत्तम चौधरी नरोत्तम गोविंद पटेल, सुरेश सुतार व इतर शेतकरी उपस्थित होते.सुनिल पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले .