नवापूर ! प्रतिनिधी
नवापूर शहरातील बेडकी शिवारात असलेल्या आर.आर इम्पेक्स टायर फेक्ट्रीत अचानक बोलयर फुटल्याने दोन मजूर जखमी झाल्याची घटना घडली.
स्थानिकाकडून मिळालेल्या माहिती नुसार जुने टायर जाळून त्या पासून ऑइल तयार करण्यात येणाऱ्या कारखान्यात दुपारी अचानक धुराचे कल्लोळ उठल्याने परिसरातील नागरिकानी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे टायर जाळण्यासाठी बॉयलरचा उपयोग केला जातो . बॉयलर फुटल्याने जवळच काम करत असलेले मजूर राकेश गंगा सिंगाळ ( वय २२) आणि पंकज लालु वासकेल (वय २२ )असे दोन मजूर जखमी झाले . जखमी अवस्थेत त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णलायत प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले . पुढील उपचारासाठी गुजरात राज्यातील व्यारा येथे हलवण्यात आले . या घटनेचा तपास नवापूर पोलीसचे पो.हे का गुमान पाडवी करीत आहे . सदर बेडकी गावात ग्रामस्थ अरविंद गावीत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की आमच्या गावात आर आर इन्फेस नावाची कंपनी आहे . या ठिकाणी टायर जाळून त्यातुन तेल काढण्याचे काम ही फॅक्टरी करीत असते . या फॅक्टरी मुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत असते ही फॅक्टरी मागील ३ ते ४ वर्षापासुन स्थलांतर आहे. मात्र दि १२ जून रोजी दुपारी या फेक्टरी मध्ये मोठा स्फोटचा आवाज येऊन दोन परप्रातीय मंजुर गंभीर जखमी झालेले आहे . अशी घटना २ ते ३ वेळा झाली आहे . सदर ही फेक्टरी बेकायदेशीर आहे प्रशासनाने सदर लक्ष देऊन ती बंद करण्यात यावी सदर प्रशासनाने वेळीच दखल घेऊन कार्यवाही केली नाही तर आम्ही सनदशील मार्गाने आंदोलन करु व होणा – या परिणामास प्रशासन जवाबदार राहील असे बेडकी गावाचे ग्रामस्थ यांनी सांगितले .