Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याशी साधला संवाद

team by team
November 3, 2021
in Uncategorized
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे  जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याशी साधला संवाद

नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे. नंदुरबार जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण होण्यासाठी प्रधानमंत्री महोदयांनी आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत विविध सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील घराघरापर्यंत आता लसीकरण मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.

या व्हिडिओ कॉन्फरन्सला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, आगामी काळात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यात येईल. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पहिला डोस घेवून दुसरा डोस घेण्यासाठी व्यापक स्तरावर अभियान राबविण्यात येईल. तशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. प्रत्येक गावात 100 टक्के लसीकरण होण्यासाठी आरोग्य विभाग, महसूल, ग्रामविकास विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल. लसीकरणासाठी गावनिहाय पथके गठित करण्यात येतील. या पथकांनी नेमून दिलेले गाव 100 टक्के लसीकरण होईल, असे नियोजन करण्यात येणार आहे. याशिवाय घरोघरी जावून लसीकरण केले जाईल. बाजाराच्या दिवशी लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे म्हणून लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येईल.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, भीती अद्याप संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात काळजी आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच 18 वर्षांवरील ज्या नागरिकांनी कोरोना विषाणूचा दुसरा डोस घेतलेला असेल अशाच तरुणांना, नागरिकांना महाविदयालय, बँक, टपाल कार्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे जिल्या कतील 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच ज्या नागरिकांना पहिला डोस घेवून पुरेसा कालावधी पूर्ण झाला आहे त्यांनी तातडीने दुसरा डोस घेवून कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी पुढे यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कापसात गांजाची शेती करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई , 8 लाख 30 हजार 690 रुपये किमंतीचा गांजा जप्त

Next Post

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दिवाळी स्नेहमिलन, मान्यवरांची हजेरी

Next Post
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दिवाळी स्नेहमिलन, मान्यवरांची हजेरी

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दिवाळी स्नेहमिलन, मान्यवरांची हजेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add