नंदुरबार l प्रतिनिधी-
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांच्या प्रमुख उपस्थितित नवी दिल्ली येथील भाजपा केंद्रीय कार्यालयात पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘जनजातीय चिंतन बैठकी’त महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह संसद रत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांनाही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभली. आदिवासींची संस्कृती, सर्वांगीण विकास, रोजगार आणि अन्य प्रमुख विषया संबंधित करावयाच्या संघटनात्मक प्रयत्नांवर या बैठकीत झालेल्या विमर्शात सहभागी होवून डॉ. हिना यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे देखील मांडले.
जनजातीय समाजाचा सर्वांगीण विकास, कल्याण, सशक्तीकरण एवं समाजाच्या आकांक्षांच्या अनुरूप संगठनात्मक प्रयत्न अधिक प्रभावी बनवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण मुद्द्यांवर या चिंतन बैठकीत विचार विमर्श झाला. या बैठकीस राष्ट्रीय संगठन महामंत्री बी. एल. संतोष, राष्ट्रीय संगठक वी. सतीश, भाजपा अनुसूचित जनजाति मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मन्नालाल रावत, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, किरेन रिजिजू एवं जुएल ओराम यांच्या सह विभिन्न राज्यातील जनजातीय कल्याण विभागाचे मंत्रीगण, वरिष्ठ सांसद, भाजपा अनुसूचित जनजाति मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी तसेच विशेष आमंत्रित सदस्य उपस्थित होते.
या बैठकीच्या संदर्भाने अधिक माहिती देताना डॉ.हिना गावित यांनी सांगितले की, “आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास, शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक अस्मितेचे जतन आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या संधी पोहोचविणे, याविषयी भारतीय जनता पार्टीची दूरदृष्टी आणि स्पष्ट विकासदृष्टी अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी आहे. आदिवासी समाजाला केवळ विकासाच्या प्रवाहात आणणे नव्हे, तर त्यांना विकासाचे भागीदार बनविण्याचा भाजपाचा संकल्प निश्चितच कौतुकास्पद आहे.”








