नंदुरबार l प्रतिनिधी-
नांदरखे ता नंदुरबार येथील प्रगती विद्या प्रसारक संस्था नंदुरबार संचलित वि.जा.भ ज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत महात्मा गांधी जयंती व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे निमित्त शाळेत विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका प्राप्ती पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक सागर नामगे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रतिमेस आदरांजली वाहिल्या.
या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी विशेष वक्तृत्व व देशभक्तिपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनावरील व त्यांच्या सत्याग्रह आणि अहिंसेच्या विचारांवर अत्यंत मार्मिक भाषणे केली. मुख्याध्यापकांनी आपल्या मार्गदर्शक भाषणात विद्यार्थ्यांमध्ये गांधीजींचे विचार रुजवण्या आणि दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.
जयंतीच्या औचित्याने शाळेच्या परिसरात ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून वर्गखोल्या, मैदान व परिसर स्वच्छ केला. तसेच सर्वांनी व्यसनमुक्त राहण्याची आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










