नंदुरबार l प्रतिनिधी-
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान भाजपाचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हे सलग आठ महिने उपचारासाठी नाशिक व मुंबई येथे दाखल होते. त्या दीर्घ आजारानंतर साधारण महिनाभरापूर्वी डॉक्टर गावित हे नंदुरबार येथे निवासस्थानी मुक्कामी परत आले आणि तेव्हापासून कार्यकर्त्यांची भेट घेत कार्यरत झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी डॉक्टर गावित यांची आवर्जून ही भेट घेतली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य वरिष्ठ पदाधिकारी तसेच भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित देखील उपस्थित होत्या.







