नंदुरबार l प्रतिनिधी-
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था, भालेर संचलित श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच द फ्युचर स्टेट इंग्लिश मीडियम स्कूल येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, भालेर गावच्या सरपंच कविता चंद्रशेखर पाटील, राकेश माळी सरपंच काकर्दे विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक पी. पी. बागुल, शानभाऊ धनगर माजी सरपंच नगाव रमेश मोदानी वासुदेव आत्माराम पाटील अभिमान पितांबर पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक एस जी सैंदाणे पर्यवेक्षक पी डी पाटील विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एम आर पाटील, ए एस पटेल ज्येष्ठ शिक्षिका सौ.सी व्ही पाटील सौ.एस पी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
द फ्युचर स्टेट इंग्लिश मीडियम स्कूलच्या ध्वजारोहणाचा मान भालेर येथील प्रतिष्ठित नागरिक सतीलाल पितांबर पाटील यांना देण्यात आला. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ध्वजारोहणाचा मान मधुकर कृष्णा पाटील यांना देण्यात आला. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिम्मतराव जगन्नाथ पाटील होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, प्रभावी भाषणे, मनमोहक नृत्याविष्कार तसेच देशभक्तीपर नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध आदिवासी लोकनृत्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत भरली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण देशप्रेमाने भारावून गेले.
या सोहळ्यास भालेर, नगाव तीशी, वडवद, काकर्डे, कोपर्ली, ओसरली, जुन मोहिदे सिंधगव्हाण उमरदे आदी परिसरातील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. पालक, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागाने स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अधिक संस्मरणीय ठरला.
स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम, सामाजिक एकोपा आणि देशाप्रती असलेली कर्तव्यभावना यांचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जल्लोषपूर्ण वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. ईशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. एस. सूर्यवंशी यांनी केले. विद्यालयातील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.








