नंदुरबार l प्रतिनिधी-
नांदरखे ता. नंदुरबार येथील प्र. वि. प्र. संस्था नंदुरबार संचलित, वि.जा. भ. ज. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा नांदरखे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिन अत्यंत देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विशाल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच मदन राठोड उपस्थित होते . त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या,विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या व गावातील लोकनियुक्त सरपंच, पंचायत समिती माजी सभापती व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक, तलाठी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांच्या भारतमाता की जय आणि उदघोषाने परिसर दुमदुमले. विद्यार्थ्यांच्या संचलनासह राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
विशेष देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राप्ती पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने भाषणे केली. इयत्ता नववीच्या विद्यार्थी पवन बंजारा, आपल्या मनोगतातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण केले. प्राथमिक मुख्याध्यापक सागर नामगे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, देशप्रेम व संविधानाचे महत्त्व सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत शिंदे यांनी मानले सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना गोड मिठाईचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले









