Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

team by team
August 15, 2026
in राजकीय
0
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्हा निर्मितीचे शिल्पकार महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन स्पर्धा संसदरत्न माजी खा. डॉ. हिना गावित व भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडली.

सदर स्पर्धा दि. 14 ऑगस्ट 2026 शुक्रवार रोजी सकाळी 7 वाजता आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास स्थानापासुन करण्यात आली. पुरुष गटात 52 खेळाडू व महिला गटात 20 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. पुरुष व महीला गटाला संसदरत्न माजी खासदार डॉ. हिना गावित व भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले.

विजयी खेळाडूंची नावे

या स्पर्धेचा मार्ग माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास स्थानापासून यशवंत विद्यालय – जी.टी.पाटील महाविद्यालय रोड – आंधारे चौक – राणा प्रताप पुतळा बस स्टॅण्ड नेहरु पुतळा गांधी पुतळा उड्डाण पुल गिरीविहार गेट स्वागत पेट्रोलपंप – करण चौफुली – पातोंडा गाव, सप्तश्रृंगी मंदिरापर्यंत परत या मार्गे डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास स्थानापर्यंत असा होता. यात विजयी होणाऱ्या प्रथम पाच क्रमांकांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रशस्ती प्रमाण पत्र घोषित करण्यात आले आहे.
पुरुष गट 21 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेत पात्र ठरलेले पाच खेळाडू असे – 1. जगन्नाथ ऊलुशा पवार, कालधर साक्री,प्रथम, 2. दुर्गेश महेंद्र अहिरे, जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार, व्दितीय, 3. पिंट्या दित्या वसावे, गोरंबा, धडगाव, तृतीय, 4. लारा जहांगीर पटले, धडगाव, चौथा, 5. आमशा सरपा वसावे, निंबापाटी, अक्कलकुवा, पाचवा.

 

महिला गट 10 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेतील बक्षिस पात्र ठरलेले पाच खेळाडू – 1. शकिला बाशा वसावे, नंदलवड, धडगाव, प्रथम. 2. मिना रायसिंग वसावे, अक्कलकुवा, व्दितीय. 3. पारांती दादी पाडवी, अक्कलकुवा, तृतीय. 4. सोकी सिताराम पावरा, सिंधी दिगर, तोरणमाळ, चौथा. 5. बालीका बन्सीलाल वसावे, धडगाव, पाचवा. या सर्व 10 बक्षिस पात्र खेळाडूंना अनुक्रमे प्रथम क्र. रु.11000/- स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र, व्दितीय क्र. रु.7100/- स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र, तृतीय क्र. रु5100/- स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र, चौथा क्र. रु.3100/- स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र, पावचा क्र. रु.2100/- स्मृतीचिन्ह, प्रशस्ती प्रमाणपत्र असे पारितोषिक दिले जाणार आहे.

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार वितरण

वरील सर्व बक्षिस पात्र स्पर्धकांना मा.डॉ. विजयकुमार गावित साहेब यांचे हस्ते दि. 26/08/2026 शुक्रवार रोजी पारितोषीके वितरीत करण्यात येतील. असे विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर ईश्वर धामणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. वरील दोन्हीही गटातील मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यात डॉ. ईश्वर धामणे, बळवंत निकुम, राजेश शाह, नितीन कबाडे, भागुराव जाधाव, अमृत भट, खुशाल शर्मा, प्रकाश गवळे, ईश्वरभाई पटेल, सौरभ राजपूत, दिपेश धामणे, राजधर बेडसे, बाबु वळवी, रवी पाडवी, दिनेश ठाकरे, किशोर तांबोळी, नरेंद्र मोरे, करण भिल, शुभम शर्मा, अशोक नाईक, शिंदे, पोलिस डिपार्टमेंट, वैद्यकीय पथक, यांनी मोलाचे सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add