नंदुरबार l प्रतिनिधी-
भालेर ता. नंदुरबार येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात “एक पेड मॉ के नाम “या अभियानांतर्गत वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश पाटील तर प्रमुख पाहुणे ग्राम महसूल अधिकारी नरेंद्र महाले ,गजानन पाटील होते.कार्यक्रमाची सुरुवात वृक्षदिंडीच्या पूजनाने झाली . विद्यालयाच्या प्रांगणातून प्राचार्य आर. एच. बागुल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली . भालेर ,नगाव , तिशी गावातून वृक्ष दिंडी काढण्यात आली वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन पर्यावरण विषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी ट्रॅक्टर वर महाराष्ट्रातील साधू संतांचे सजीव देखाव्याचे वेशभूषा धारण केली होती.विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख गांधी टोपी सदरा धोतर हातात टाळ मृदूंग असा वारकरी पेराव केलेला होता .विद्यार्थिनींनीही पारंपारिक नऊवारी साडी नेसून दिंडीत सहभाग घेतला. “झाडे लावा झाडे जगवा” , “वृक्ष लावा पाऊस वाढवा” यासारख्या घोषणांद्वारे संदेश देऊन वृक्षारोपणासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पर्यावरणावर गीत सादर करून समाजात सकारात्मक पर्यावरणाविषयी संदेश दिला तसेच विद्यार्थिनींनी “माऊली माऊली” या गीतावर लेझीम नृत्य सादर केले. उपस्थित मान्यवरांकडून टाळ्यांच्या तसेच कौतुकांचं दाद मिळाली. यानंतर शाळेच्या प्रांगणांमध्ये आलेल्या मान्यवरांकडून हरित सेनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यालयात तयार केलेले सुमारे ८०० सीड बॉल (बीज गोळे) सामाजिक वनीवनीकरण अधिकारी सोनाली बोरसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यानंतर शाळेच्या प्रांगणात मुख्याध्यापक / प्राचार्य राजेंद्र बागुल यांनी वृक्षलागवडीचे महत्व पटवून दिले,सामाजिक वनीकरण विभागातील वनपाल श्रीमती बोरसे यांनी पर्यावरण जनजागृती विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दिलीप पाटील, नानाभाऊ पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश पाटील,हंसराज पाटील,दत्तात्रय पाटील, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.बी पाटील यांनी तर आभार डी.टी.मोरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.











