नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार के. डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात आर्मी डे चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य शरद पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून प्रल्हाद संदानशिव उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वीर जवानांना अभिवादन म्हणून अमर जवान या प्रतिमेस रीथ अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी मान्यवरांनी वीर जवानांविषयी माहिती देताना त्यांचे त्याग, बलिदान, शौर्य, देशभक्ती याविषयी माहिती सांगितली. आर्मी डे का साजरा केला जातो याविषयी देखील शिक्षण निर्देशक नरेंद्र बागुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यानंतर शालेय इयत्तानुसार ड्रिल कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आले. यात इयत्ता सहावी ते दहावी अशा सर्व वर्गांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी परीक्षक म्हणून महेंद्र बांगर व इकबाल शहा यांनी कार्य पाहिले. सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन हे सैनिक निदेशक नरेंद्र बागुल व प्रवीण मोरे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रजनी करले यांनी तर आभार प्रदर्शन नरेंद्र बागुल यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.








