नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयात इयत्ता 10 वी मध्ये शिकणाऱ्या वैष्णवी मानकरने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले.
27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत आगरतळा त्रिपुरा येथे 69 व्या शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या त्यात महाराष्ट्र राज्याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली.महाराष्ट्राच्या संघात नंदुरबारच्या वैष्णवी मानकरचा समावेश होता.
नंदुरबारातील एकलव्य विद्यालयात इयत्ता 10 वी मध्ये शिकणाऱ्या वैष्णवी मानकरला या स्पर्धेत मिळालेल्या यशाने तिच्या बुद्धिबळ प्रवासात आणखी एक टप्पा गाठला आहे.तिच्या एकाग्रता रणनीती आणि कल्पनाशक्ती मुळे तिने हे यश मिळवले आहे.
नंदुरबारातील अव्वलमानांकित बुद्धिबळ खेळाडू वैभव बोरसे हे तिचे वैयक्तिक प्रशिक्षक असून त्यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.








