नंदुरबार l प्रतिनिधी-
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित, संसद रत्न पुरस्कारप्राप्त माजी खासदार डॉ. हिना गावित, तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी मंदिरात हजेरी लावत खोडाई मातेचे दर्शन घेतले आणि
या प्रसंगी सर्वांनी माता खोडाईच्या चरणी नतमस्तक होत नंदुरबार जिल्ह्यातील जनतेसाठी सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांततेची प्रार्थना केली.
डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले की, “नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना. खोडाई मातेच्या कृपेने जिल्ह्यात सर्वत्र सौहार्दाचे वातावरण नांदो आणि सर्वांचे जीवन समृद्ध होवो, हीच प्रार्थना आहे.”
माजी खासदार डॉ. हिना गावित यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “आई खोडाईमातेच्या आशीर्वादाने नंदुरबार जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि महिलांना सशक्तीकरणाची ऊर्जा मिळावी,” अशी अपेक्षा आहे.
यावेळी मंदिर परिसरात धार्मिक उत्साह ओसंडून वाहत होता. सजवलेले मंदिर, देवीचे अलंकारिक रूप, आणि भक्तांचे मंत्रोच्चार वातावरण भारावून टाकत होते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही खोडाई माता मंदिरात विशेष पूजा-अर्चा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने देवीदर्शनासाठी येत आहेत. शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलप्रसंगी नंदुरबार शहरातील ग्रामदैवत आई खोडाई माता मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.