नंदुरबार l प्रतिनिधी –
नंदुरबार शिवसेना पक्षातील शिवसेनेचे युवा नेते व दोन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या उपस्थितीत “विजयपर्व” भाजपा जिल्हा कार्यालय नंदुरबार येथे भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.
नंदुरबार येथील शिवसेनेचे युवा नेते संदीप चौधरी, माजी नगरसेवक प्रमोद बोडके व माजी नगरसेवक जयसिंग राजपूत यांच्या सह शेकडो शिवसैनिकांनी शिवसेनेला “जय महाराष्ट्र” करीत भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या उपस्थितीत नंदुरबार भाजपा जिल्हा कार्यालय “विजयपर्व” येथे झालेल्या शानदार प्रवेश सोहळ्यात हा कार्यक्रम संपन्न झाला.
शेकडो शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केल्यामुळे शिवसेना गटात एकच खळबळ उडाली असून पुढील काळात देखील विविध पक्षातील नेते कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत दाखल होतील असा विश्वास प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी संदीप चौधरी सह शेकडो कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
संदीप चौधरी, प्रमोद बोडके व जयसिंग राजपूत यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन खानवाणी, डॉ. सपना अग्रवाल व राजेंद्र सोनार, शहराध्यक्ष नरेश कांकरिया, संदीप चौधरी, काजल मछले, मंदार चौधरी सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.