नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांच्या वाढदिवसानिमित्त विजय क्रीडा गौरव महोत्सव समिती आयोजित रस्सीखेच, फुटबॉल आणि लंगडी या विविध स्पर्धांचे उद्घाटन अत्यंत उत्साहात झाल्यानंतर सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आणि युवक युवतींनी अत्यंत चित्ताकर्षक खेळ सादर करीत उपस्थितांचे मन जिंकले.
या स्पर्धा 24/08/2025 व 25/08/2025 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या तथापि सततच्या पावसामुळे बॅडमिंटन वगळता उर्वरित मैदानी स्पर्धा थांबविण्यात आल्या होत्या. म्हणून त्या स्पर्धा दिनांक 30 ऑगस्ट आणि आज 31 ऑगस्ट या दोन दिवसात श्रॉफ हायस्कुल नंदुरबार, एस.ए. मिशन हायस्कुल नंदुरबार, जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे घेण्यात आल्या.
माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन पार पडले. रस्सीखेच, फुटबॉल आणि लंगडी या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या बड्या शालेय संस्थांपेक्षा नगरपालिकेच्या शाळांमधील आणि अन्य छोट्या शाळांमधून आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी दाखवलेले कौशल्य विशेष उल्लेखनीय ठरले. नंदुरबार येथे अथलेटिक्स स्पर्धांसाठी सुद्धा चांगले विद्यार्थी उपलब्ध असून भविष्यात नंदुरबार जिल्हा अथलेटिक्स स्पर्धेत सुद्धा पुढे जाऊ शकतो हे यानिमित्ताने निदर्शनास आले.
उद्घाटन प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी तालुका अध्यक्ष जे एन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर तांबोळी, प्रवीण पाटील, वैदाने गावचे उपसरपंच डॉ मनोज गिरासे, क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे क्रीडा शिक्षक बळवंत निकुंभ क्रीडा शिक्षक राजेश शहा क्रीडाशिक्षक त्रिवेदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून सबस्टीन जयकर, आमोश डलगे, अक्षय परदेशी, संकेत डलगे, करण चव्हाण, योगेश निकम आदींनी काम पाहिले.