तळोदा | प्रतिनिधी
शासनाने उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मात्र ही नुकसान भरपाई फक्त सातबारा धारक शेतकऱ्यांनाच मंजूर केली आहे. मात्र वनपट्टे धारकांना व प्रलंबित आणि अपीलमध्ये असणाऱ्या दावे धारकांना नुकसान भरपाईचा उल्लेख नाही हा आदिवासी शेतकऱ्यांवर अन्याय असून जमिनीचे मालक असूनही ह्या कायदेशीर हक्काला यामुळे अडचण येवू शकते.
दि.१८ ऑक्टोबर २०२१ रोजी तळोदा तहसिल कार्यालयात ११ वाजता लोकसंघर्ष मोर्चाच्या तळोदा तालुका प्रमुखांनी मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन दिले. यावेळी बाबूसिंग नाईक, दिगंबर खर्डे, बुधाभाऊ, गोविंद वसावे, दिलवर पाडवी यांच्यासह सर्व गांव प्रतिनिधी उपस्थित होते.








