Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

team by team
June 17, 2025
in राज्य
0
जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

 

नंदुरबार l प्रतिनिधी

शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात आज जिल्ह्यात मोठ्या उत्साहात झाली, जिथे शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून सुमारे 25 हजार नवीन विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेत स्वागत करण्यात आले आणि त्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले.

फेब्रुवारी 2025 पासूनच शाळांनी इयत्ता पहिलीच्या वर्गात नवीन बालकांचे प्रवेश घेण्यासाठी शाळापूर्व तयारी कार्यक्रमाद्वारे नियोजन केले होते. या नियोजनामुळे सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश निश्चित केला, त्यापैकी सुमारे 19 हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.

 

शालेय शिक्षण विभागाने 12 मार्च 2025 जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यभरातील सर्व शाळांसाठी 100 शाळांना भेटी देण्याचा उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते. या उपक्रमांतर्गत राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक आणि सर्व विभागांचे विभागप्रमुख अधिकारी यांनी पहिल्याच दिवशी निश्चित केलेल्या गावातील शाळांना भेटी देऊन प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन केले होते.

 

यावेळी माजी मंत्री तथा नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी जिल्हा परिषद शाळा, नटावद व देवपूर येथे विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शहादा/तळोद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी दलेलपूर जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी आश्रमशाळा नवागाव व जिल्हा परिषद शाळा बोरवण येथे विद्यार्थ्यांचे स्वागत केले. धडगांव/अक्कलकुव्याचे आमदार आमशा पाडवी यांनी ब्रिटीश अंकुशविहीर येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्हा परिषद शाळा, सुंदरदे येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार आणि माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांनी जिल्हा परिषद शाळा, गुजरभवाली येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

 

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी जिल्हा परिषद शाळा, लोय येथे नवागतांचे स्वागत केले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे यांनी जिल्हा परिषद शाळा, कोठली येथे भेट दिली. जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक, विवेक गुंड यांनी जिल्हा परिषद शाळा, जोगणीपाडा येथे भेट दिली. प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी जिल्हा परिषद शाळा, दुधाळे व ठाणेपाडा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी नंदुरबार शहरातील एस.ए. मिशन माध्यमिक शाळा, महात्मा फुले माध्यमिक शाळा येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

 

 

प्राथमिक उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांनी तळोदा येथील धवळीविहीर व दलेलपूर येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. योजना शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे व योजना उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे यांनी नगरपालिका प्राथमिक शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

यासोबतच, जिल्हा परिषदेचे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागांचे विभागप्रमुख, तालुकास्तरावरील तहसिलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी देखील जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन सर्व विद्यार्थ्यांचे समारंभपूर्वक स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट व मोजे वितरित करण्यात आले. या समारंभपूर्वक स्वागतामुळे सर्व विद्यार्थी आणि पालक भारावून गेले होते, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान स्पष्ट दिसत होते.

 

दरवर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जातो, परंतु यावेळी सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे शिक्षकांमध्येही प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठा उत्साह दिसून आला. प्रवेशोत्सवाचे नियोजन प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, समग्र शिक्षाच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मनीषा पवार, योगेश रघुवंशी आणि आसिफ पठाण यांनी केले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

Next Post

तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

Next Post
तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add