नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील प्रतापपुर शेत शिवारात बैल विकत घेण्याच्या मागणीच्या कारणांवरून मोठ्या भावाने लहान भावास जीवेठार मारल्याची घटना घटना १५ दिवसांपूर्वी घडली होती.याबाबत दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाचा उलगडा झाला.दरम्यान खून करून एका बंदिस्त बोअरवेल मध्ये मृतदेह फेकून दिला होता . काल दि. १७ ऑक्टोंबर अखेर जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले असून.ओळख पटल्यानंतर काल त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, . दि. 24 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास प्रतापपुर गावाच्या शिवारातील साहेबराव चव्हाण यांच्या शेतातील झोपडीत
संशयीत आरोपी सारपा कर्मा पाडवी रा.राणीपुर ता . तळोदा याने बैल विकत मागणीच्या कारणावरुन बामण्या कर्मा पाडवी ( वय 50 वर्षे ) रा.चिऊल उतार ता . अक्कलकुवा यास लाकडी डेंगाऱ्याने डोक्याला मारुन जिवे ठार मारले. दरम्यान सारपा पाडवी याच्या पत्नीने विरोध केला असता तिलाही जीवेठार मारण्याची धमकी दिली . याप्रकरणी तसेच सदर घटने बाबत साक्षीदार सौ . कौशल्याबाई सारपा पाडवी हीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रायकाबाई बामण्या पाडवी रा.चिऊल उतार ता.अक्कलकुवा यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी सारपा कर्मा पाडवी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संशयित सारपा यास ताब्यात घेतले असता त्याने बामण्या याचा खून करुन बोअरवेलमध्ये फेकल्याची कबुली दिली . त्यानुसार काल दि.१७ ऑक्टोंबर रोजी तळोदा तालुक्यातील प्रतापपूर शिवारात काल सकाळपासूनच पोलीस जे . सी . बी घेऊन घटनास्थळी पोहचले होते . तसेच तब्बल तीन तासांचा अथक परिश्रम करत बोअरवेलमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला . या गंभीर घटनेची दखल घेत अक्क लकुवा येथील उपविभागीय अधिकारी शिवाजी सावंत यांनी रविवारी भेट देऊन पाहणी करत मयताच्या कुटूंबियांशी चर्चा करत सविस्तर माहिती जाणून घेतली .काल दुपारी ३ वाजेच्या सुमारास जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले असून.ओळख पटल्यानंतर काल त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने परिश्रम घेतले .








