Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा येथे बचत गटाच्या महिला मेळावा

team by team
June 15, 2025
in राजकीय
0
आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा येथे बचत गटाच्या महिला मेळावा

अक्कलकुवा l प्रतिनिधी-

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोणत्याही कामाचा मनात न्यूनगंड न बाळगता ते काम प्रामाणिकपणाने करुन त्यात समाधान मानावे तीच खऱ्या आयुष्याची व यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन आमदार आमश्या पाडवी यांनी केले.

सोरापाडा येथील श्री. महाकाली माता मंदिराच्या सभागृहात महाराष्ट्र ग्रामिण जीवन्नोती अभियान (उमेद) यांच्या वतीने तालुक्यातील होराफळी, मोरंबा, खापर, अक्कलकुवा, सिंगपूर या 5 जिल्हा परिषद गटातील महिला बचत गटांच्या कार्यकर्ती महिलांचा भव्य महिला मेळावा संपन्न झाला.

यावेळी अध्यक्षस्थाना वरुन आमदार पाडवी बोलत होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे तालुका प्रमुख तुकाराम वळवी, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी, जिल्हा व्यवस्थापक सचिन बोरसे, सरपंच वसंत वसावे, ललित जाट, आनंद वसावे, सुनिता पाडवी, सौ. संध्या पाटील, निता माळी, छाया वळवी, सरला वळवी, मथुरा पाडवी, दुर्गा पाडवी, रावेंद्रसिंह चंदेल, नवरतन टाक, दिनेश खरात, अश्विन तडवी, रविंद्र चौधरी, रामसिंग वसावे, घिजु वसावे, ईश्वर तडवी आदीं उपस्थित होते.

मेळाव्याचे प्रास्ताविक उमेदच्या तालुका समन्वयक मिनाक्षी वळवी यांनी केले त्यात त्यांनी तालुक्यातील उमेद अभियानाच्या प्रगतीची माहिती दिली. तर यावेळी आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते तालुक्यातील चार प्रभाग संघातील 112 बचत गटांना 67 लाख 40 हजार रुपयांचा निधी चेक द्वारे प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,

कोणत्याही व्यवसायाची सुरुवात छोट्या पासुन करा, ते व्यापक होण्याच्या दृष्टीने आवश्यक परिश्रम घेण्याची तयारी ठेवा. काम करत असतांना मोठी स्वप्ने ही बघा मात्र ती पुर्ण करण्यासाठी कठीण परिश्रमाची त्याला जोड द्या. तरंच मनात धारलेलं स्वप्न पुर्ण होण्यास बळ मिळेल. याप्रसंगी नवरतन टाक, ललित जाट, सुमन वळवी, ज्योती पाडवी, संगिता तडवी यांनीही मनोगत व्यक्त केले.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी तालुका अभियान व्यवस्थापक
मिनाक्षी वळवी, प्रभाग समन्वयक मगन पाडवी, तुषार वळवी, योगेश जाधव रायसिंगपूर, राकेश वसावे आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांच्या हस्ते ॲम्बुलन्सचे लोकार्पण

Next Post

कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरे जावं; आ.चंद्रकांत रघुवंशी

Next Post
कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे  सामोरे जावं; आ.चंद्रकांत रघुवंशी

कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरे जावं; आ.चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add