नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदार संघ आहेत. या निवडणुकीसाठी आज माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात 32 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वाधिक 12 उमेदवार नवापूर विधानसभा मतदार संघात तर सर्वात कमी 3 उमेदवार शहादा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात विधानसभा मतदार संघात एकूण 17 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 10 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 7 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.
यामध्ये ॲड.के.सी.पाडवी ( काँग्रेस ), आ. आमश्या पाडवी (शिवसेना शिंदे गट),डॉ.हिना गावित ( अपक्ष ), ॲड.पद्माकर वळवी ( भारतीय आदिवासी पार्टी) इतर 3 तीन अपक्ष उमेदवार आहेत. या मतदारसंघात 3 लाख 12 हजार 270 मतदार आहेत.
शहादा विधानसभा मतदार संघात एकूण 12 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 9 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 3 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे. यात राजेश पाडवी ( भाजप ), राजेंद्रकुमार गावित ( काँग्रेस )
व एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. मतदारसंघात 3 लाख 45 हजार 536 मतदार आहेत.
नंदुरबार विधानसभा मतदार संघात एकूण 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 4 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 9 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.
यात डॉक्टर विजयकुमार गावित ( भाजप ),ईंजी.किरण तडवी ( काँग्रेस ), वासुदेव गांगुर्डे ( मनसे) ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी यांच्यासह पाच अपक्ष उमेदवार आहेत. या विधानसभा मतदारसंघात 3 लाख 47 हजार 229 इतके मतदार आहेत.
नवापूर विधानसभा मतदार संघात एकूण 21 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 9 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 12 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे. यामध्ये शिरीषकुमार नाईक ( काँग्रेस ) भरत गावित ( राष्ट्रवादी, अजित पवार गट ),शरद गावित ( अपक्ष ) याच्यात प्रमुख लढती होण्याची शक्यता आहे.नवापूर मतदारसंघात सर्वाधिक बारा उमेदवार आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासह भारतीय आदिवासी पार्टी, पिझंट्स अँड वर्कर पार्टी ऑफ इंडिया यांच्यासह आठ अपक्ष उमेदवार असून मतदार संघात 2 लाख 91 हजार 953 इतके मतदार आहेत.
यांनी घेतली माघार
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात एकूण
63 उमेदवार होते. यामध्ये हा शेवटच्या दिवशी 32 उमेदवारांनी माघार घेतली. यात अक्कलकुवा तालुक्यातून शंकर आमश्या पाडवी, सुप्रिया विजयकुमार गावित, हेमलताबाई कागडा पाडवी, विजयसिंग रूपसिंग पराडके, नागेशकुमार पाडवी, रतन पाडवी, भरत जाल्या पाडवी, रीना राजेंद्र पाडवी, देवीसिंग वळवी, गणेश पराडके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर शहादा मतदारसंघातून मदन मिठ्या पावरा, केलसिंग पावरा, विभूती राजेंद्रकुमार गावित, सुहास वेच्या गावीत, कमला उर्फ सपना मोहनसिंग शेवाळे, मोहनसिंग पवनसिंग शेवाळे, अलीबाबा रशीद तडवी, गुलाब बर्डे, जयसिंग बिजला पावरा यांनी उमेदवार अर्ज माघार घेतला. तर नंदुरबार मध्ये आनंदा सुकलाल कोळी, पवनसिंग पवनसिंग शेवाळे, रीना राजेंद्र पाडवी, विश्वनाथ कांतीलाल वळवी यांनी उमेदवारी मागे घेतली.तर नवापूर मध्ये धनंजय भरत गावित, कृष्णा छोटूभाई मावची, दिलीप वसंत गावित, अजय तानाजी वसावे यांच्यासह रामा तिज्या गावित यांनी माघार घेतली.