Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कॉपर केबल चोरी करणारे संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, असून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

team by team
October 19, 2024
in क्राईम
0
कॉपर केबल चोरी करणारे संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, असून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार तालुक्यातील कॉपर केबल चोरी करणारे इसम स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात असून 1 लाख 57 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील शनिमांडळ गाव शिवारातील सुझलॉन कंपनीचे टॉवर मधुन काही अज्ञात चोरटयांनी कॉपर केबल चोरुन नेल्या बाबत रहिवासी खंडू वना पाटील यांचे फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असतांना स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली की, सदरची चोरी ही नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील चाकळे गावातील इसम किशोर मालचे याने त्याचे साथीदारांसह मिळून केली असुन तो सध्या नंदुरबार शहरातील जिजामाता कॉलेज परिसरात फिरत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी लागलीच एक पथक तयार करुन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना केले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेले बातमीचे अनुषंगाने शहरातील जिजामाता कॉलेज परिसरात जावून खात्री केली असता, बातमीप्रमाणे इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव किशोर सुपडू मालचे, रा. चाकळे ता. जि. नंदुरबार असे सांगितले. सदर इसमास वरील दाखल गुन्हयाबाबत विचारपुस करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला म्हणुन त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदरची चोरी त्याचा साथीदार गणेश शत्रु सोनवणे, दिलीप प्रताप सोनवणे, सतिश संतोष मोरे, शाम नाना मालचे, राम नाना मालचे, रमा सुपडू, विनोद सुपडू, देवा (पुर्ण नाव माहित नाही), सर्व रा. चाकळे ता.जि. नंदुरबार यांच्या मदतीने केली असल्याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यास गुन्हयातील चोरी गेलेल्या मालाबाबत विचारता सदरचा चोरी केलेला मुद्देमाल हा नंदुरबार शहरातील जम-जम हॉस्पीटलचे मागे राहणा-या शाकीर युसूफ काकर, या भंगार व्यापा-यास विक्री केल्याचे त्याने सांगितले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने भंगार व्यापाऱ्याचा शोध घेतला असता तो मिळून

आल्याने त्यास नमुद गुन्हयातील मुद्देमालाबाबत विचारता त्याने सदरचा माल हा सुमित नरेंद्र जैन, रा.शिवाजी रोड, नंदुरबार यास विक्री केले असल्याचे सांगितले. त्यानुसार लागलीच स्थानिक गुन्हे पथकाने सुमित जैन यास देखील ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल बाबत विचारणा केली असता त्याने सदरचा मुद्देमाल हा त्याचे पातोंडा शिवारातील गॅस गोडावूनचे पाठीमागील बाजुस ठेवले असल्याचे सांगितले. सदर ठिकाणाहून एकुण 1 लाख 57 हजार 850 रुपये किमतीची सुझलॉन टॉवरमध्ये वापरण्यात येणारी कॉपर केबल मुद्देमाल मिळून आला आहे.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोउपनि मुकेश पवार, पोह राकेश मोरे, रमेश साळुंखे, पोना मोहन ढमढेरे, पोकों विजय ढीवरे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार – वाका चार रस्त्यादरम्यान वैश्याव्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलवर पोलीसांची रेड, हॉटेल मालकासह चौघांना अटक

Next Post

नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारासोबत, पाच व्यक्ती व ताफ्यात तीनच वाहने असावीत : जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add