Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चोरीच्या 18 मोटरसायकली पोलिसांनी केल्या जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

team by team
October 16, 2024
in क्राईम
0
चोरीच्या 18 मोटरसायकली पोलिसांनी केल्या जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

नंदुरबार l प्रतिनिधी

मोटार सायकलींचे एकुण 5 गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले असून चोरीच्या 18 मोटारसायकली त्यांनी हस्तगत केल्या आहेत.

 

शहादा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी बायला रुल्या पाडवी यांची होंडा कंपनीची मोटर सायकल ही त्यांचे राहत्या घराचे अंगणातून चोरी झाल्याबाबतची फिर्यादवरुन शहादा पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडुन समांतर तपास सुरू असतांना स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली की, तळोदा शहरात बस स्थानक परिसरात दोन इसम एक विना क्रमांकाची मोटारसायकल विक्री करीत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी लागलीच एक पथक तयार करुन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना केले.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेले बातमीचे अनुषंगाने तळोदा शहरातील बस स्थानक परिसरात जावून खात्री केली असता, दोन इसम हे विना क्रमांकाचे दुचाकीसह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी त्यांचे नाव अशोक सरदार पावरा, रविंद्र चिवला पावरा, दोन्ही रा.रेवानगार ता. तळोदा असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित इसमांना त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या मोटार सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना पुन्हा विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस केली असता त्यांनी सदरची गाडी नवलसिंग चव्हाण, रा. गोगलपूर जि. अलीराजपुर, मध्य प्रदेश व त्याच्या सोबत असलेल्या एका साथीदाराकडून भूषा ता. धडगाव येथे विकत घेतल्याचे सांगितले. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने भुषा ता.धडगाव येथे नवलसिंग चव्हाण व त्याचा साथीदाराचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने नवलसिंग रुपला चव्हाण, नस-या नाहल्या कनेश, दोन्ही रा. गोगलपूर पो. उमराली जि. अलीराजपूर यांना अटक केली.

 

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित इसमांकडे मिळून आलेल्या मोटारसायकली बाबत अधिकची
विचारपूस करता त्यांनी काही मोटारसायकली शहादा शहराचे जवळ असलेल्या एका खेडे गावातुन चोरी केले असल्याचे कळविले. सदर इसमांकडे अजुन काही मोटारसायकली असण्याची दाट शक्यता असल्याने त्यांना अधिकची विचारपुस करता त्यांनी मागील काही वर्षांमध्ये गुजरात व मध्यप्रदेश राज्यातुन काही मोटारसायकली चोरी केल्या असून सदर मोटारसायकली अशोक पावरा, रविंद्र पावरा यांचे मदतीने विक्री केल्याचे सांगितले. तसेच काही मोटार सायकली अशोक पावरा व रविंद्र पावरा यांचे राहत्या घराचे परिसरात लपवून ठेवले असल्याची त्यांनी सविस्तर माहिती दिली. तरी वरील नमुद इसमांकडुन स्थानिक गुन्हे शाखेला एकुण 8 लाख 15 हजार रुपये किमतीच्या एकूण 18 मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.

 

 

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोउनि मुकेश पवार, पोह बापू बागुल, विशाल नागरे, सुनिल पाडवी, मनोज नाईक, पोना विकास कापूरे, पुरूषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, पोकों विजय ढीवरे, शोएब शेख, अभिमन्यु गावित, दिपक न्हावी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तापी नदीकाठावरील नागरिक व गावांनी सतर्कतेता बाळगावी : डॉ. मित्ताली सेठी

Next Post

नंदुरबार पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराची मनमानी विविध आदिवासी सामाजिक संघटनांचे प्रशासनाला निवेदन

Next Post
नंदुरबार पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराची मनमानी  विविध आदिवासी सामाजिक संघटनांचे प्रशासनाला निवेदन

नंदुरबार पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराची मनमानी विविध आदिवासी सामाजिक संघटनांचे प्रशासनाला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add