Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तीन राज्यातून चोरलेल्या 7 दुचाकी जप्त, एकास अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

team by team
October 14, 2024
in क्राईम
0
तीन राज्यातून चोरलेल्या 7 दुचाकी जप्त, एकास अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

नंदुरबार l प्रतिनिधी
तीन राज्यातून चोरलेल्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.

धडगाव पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी दिनेश जांग्या पावरा यांची बजाज कंपनीची मोटर सायकल ही शहादा येथुन चोरी झाल्याबाबतची फिर्यादवरुन शहादा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडुन समांतर तपास सुरू असतांना स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली की, वरील गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल ही चांदसेली ता. शहादा येथे राहणा-या एका इसमाकडे असुन तो सदर वाहन वापरत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी लागलीच एक पथक तयार करुन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेले बातमीचे अनुषंगाने चांदसैली गाव परिसरात जाऊन खात्री केली असता,

 

एक इसम वरील वर्णनाप्रमाणे विना क्रमांकाचे दुचाकी वाहनासह मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव पुरूषोत्तम ऊर्फ सत्यम संतोष सुळे, रा. चांदसैली ता. शहादा जि. नंदुरबार असे सांगितले. त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटारसायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस करता त्याने सदरची मोटारसायकल ही त्याचा साथीदार सागर छगन सोनवणे रा.चिरखान ता. शहादा यांच्यासह शहादा शहरातुन चोरी केली असल्याचे सांगितले. सदर इसमास अधिक खोलात जाऊन विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार सागर छगन सोनवणे, रा. चिरखान ता. शहादा, योगेश कांतीलाल पावरा, रा. चांदसैली ता. शहादा यांच्यासह नाशिक, मध्यप्रदेश व गुजरात राज्यातुन देखील अजुन काही मोटारसाकली चोरी केले असल्याचे सांगितले. सदर इसमाचे दोनही साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने लागलीच ताब्यात घेऊन सदर आरोपींकडुन चोरी करुन आणलेल्या मोटारसायकली कुठे आहेत बाबत विचारता, त्या चांदसैली गावाचे एका झोपडीमागे लपवून ठेवले असल्याची त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांनी दिलेल्या माहितीचे आधारे नमुद ठिकाणी जाऊन तपासणी केली असता तेथे देखील काही मोटारसायकली मिळून आल्या आहेत.

 

 

वरील नमुद इसमांकडुन स्थानिक गुन्हे शाखेला एकुण 6 लाख 54 हजार. किमतीच्या एकूण 7 मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोना विकास कापूरे, पोना पुरूषोत्तम सोनार, पोना मोहन ढमढेरे, पोकॉ विजय ढीवरे, पोकों यशोदीप ओगले यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ज्योत्सना गावित यांची भारतीय जनता पार्टी युवती जिल्हाध्यक्षपदी निवड

Next Post

मनरेगातून 15 गावांमधील 25 कोटी रुपये खर्चाच्या 115 कामांना मंजुरी; मंत्री डॉ. गावित यांच्यामुळे ग्रामपंचायतींना लाभ

Next Post
मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे नंदुरबार शहरातील सुमारे 9 कोटी 50 लाख रुपयांच्या आणखी 12 समाज मंदिरे आणि सभागृह बांधणीच्या कामांना मंजूरी

मनरेगातून 15 गावांमधील 25 कोटी रुपये खर्चाच्या 115 कामांना मंजुरी; मंत्री डॉ. गावित यांच्यामुळे ग्रामपंचायतींना लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add