नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा अचिव्हर हाईट्स इंटरनॅशनल स्कुल येथे प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,शालेय शिक्षण राज्यमंत्री  ना.बच्चुभाऊ उर्फ ओमप्रकाश कडू व  राज्याध्यक्ष विकास घुगेे यांच्या आदेशानुसार  प्रहार  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कोषाध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हा संघटक गणेश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्यकारीनी पदाधिकारी यांच्यातर्फे शहादा तालुका कार्यकारीणी घोषित करण्यात आली.

शहादा पं.स.अंतर्गत शिक्षकांच्या न्यायोचित प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी तुकाराम अलट  यांची प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या शहादा तालुका अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. तालुक्यात प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या कार्यकारीनीच्या निवडीमुळे  तालुक्याला बरेच वर्षानंतर एक कुशल व निर्भिड व्यक्तीमत्व ,उपक्रमशील  खंबीर नेतृत्व मिळाल्याने, प्रहार शिक्षक, शिक्षकेतर संघटनेच्या माध्यमातून  शिक्षकांच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल. यात तालुकाध्यक्ष तुकाराम अलट ,तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे, सचिव मन्मथ बरडे, कोषाध्यक्ष ज्ञानोबा सुरनर,मुख्य सल्लागार विक्रम मोहारे,मुख्य संघटक शक्ती धनके, सहसंघटक प्रकाश जाधव, प्रसिद्धीप्रमुख दिगंबर टिळे व शंकर मेंडके, तालुका संघटक संजय जाधव,महिला संघटक सौ.मीना पाटील,तालुका संघटक  विठ्ठल कुरे, सहसचिव  निर्मलकुमार पाटील, खजिनदार पांडुरंग आंधळे, तालुका संघटक सावन कुमार ठाकरे,सहसचिव निलेश ढगे यांची शहादा कार्यकारणीत निवड करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी मार्गदर्शन करताना नुतन कार्यकारणी निवड आपल्या शैक्षणिक कार्याची व चळवळीतील योगदानाचा विचार करुन करण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल प्रथम सर्वांचे मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नियुक्ती संघटनेच्या ध्येयधोरणास कटिबद्ध असून आपण प्रामाणिकपणे वाटचाल करून संघटनेची व संघटनेचे प्रेरणास्थान शालेय शिक्षणराज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे विचार तळागाळापर्यंत न्याल हा विश्वास वाटतो. आपण वेळोवेळी संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी पदाधिकारी यांच्या आदेशानुसार व धोरणानुसार कार्य कराल अशी आशा बाळगावी.आपल्या नियुक्तीने शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत समस्यांना न्याय मिळवून देण्याबाबत आपण आपल्या स्तरावर वेळोवेळी प्रयत्न करावेत संघटनेच्या आपल्याला प्रदान केलेल्या पदाची व संघटनेची प्रतिमा मलीन होईल असे कुठलेही कार्य घडू नये अशी दक्षता घ्यावी ही अपेक्षा आहे. असे सांगितले.निवडीमुळे  शहादा तालुक्यातील सर्व  शिक्षक कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.जिल्हाभरातील तालुका कार्यकारीनी पदाधिकारी यांच्या कडून अभिनंदन व पुढिल वाटचालीकरीता सर्व तालुका कार्यकारीनीस शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मन्मथ बरडे तर सूत्रसंचालन शक्ती धनके यांनी केले.उपस्थितांचे आभार शंकर मेंडके यांनी मानले.
 
			
 
                                







