Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंत्री डॉ. गावित यांनी दिली दिवाळीची मोठी भेट, बांधकाम कामगारांना मिळणार 5000 रुपयांचे भरीव अर्थसहाय्य

team by team
October 11, 2024
in राजकीय
0
मंत्री डॉ. गावित यांनी दिली दिवाळीची मोठी भेट, बांधकाम कामगारांना मिळणार 5000 रुपयांचे भरीव अर्थसहाय्य

नंदुरबार l प्रतिनिधी-

बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दीपावलीची मोठ्ठी भेट दिली आहे. ही आनंदाची मोठी बातमी अशी की नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे बांधकाम कामगारांना 5000 रुपयांचे भरीव अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आला. या वृत्ताला स्वतः नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दुजोरा दिला.

 

नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी कामगार महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजनांच्या पाठोपाठ आता सर्व नोंदणीकृत कामगारांना 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य शासनाकडून मिळवून दिले असून क्रांतिकारी निर्णय करीत महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता दिली आहे.

 

 

बांधकाम कामगारांना एका वेळी एवढे मोठे अर्थसहाय्य मिळण्याची कदाचित ही पहिली घटना असावी. यामुळे ही बातमी पसरताच नंदुरबार जिल्ह्यातून नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या बद्दल विशेष भावना व्यक्त होताना दिसल्या. बांधकाम कामगारांना सुरक्षा संच माध्यमातून विविध वस्तूंचा लाभ देणारी योजना त्यांनी नुकतीच राबवली आणि नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 25000 जणांना त्याचा लाभ झाला. त्याचबरोबर 30 भांड्यांचा संच देखील त्यांनी नुकताच वाटप केला आणि त्याचा प्रत्येक तालुक्यातील शेकडो महिलांना लाभ झाला.

 

 

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून सुमारे एक लाख महिलांना त्यांनी लाभ मिळवून दिला आहे या सर्व पार्श्वभूमीवर कामगारांना दसरा आणि दिवाळीच्या प्रसंगी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य मिळणार म्हटल्यावर अधिकच वातावरण निर्मिती बनली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोलगी ग्रामीण रुग्णालयाला मिळाला उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा

Next Post

जनता दरबारात काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Next Post
जनता दरबारात काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

जनता दरबारात काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add