Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काठीच्या दसरा उत्सवावर यंदा ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच, महिला-मुलींची छेडछाड अन् अवैध धंदे रडारवर

team by team
October 9, 2024
in राजकीय
0
काठीच्या दसरा उत्सवावर यंदा ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच, महिला-मुलींची छेडछाड अन् अवैध धंदे रडारवर

मोलगी l प्रतिनिधी-

विजया दशमीनिमित्त काठी (ता.अक्कलकुवा) येथे साजरा होणारा दसरा हा अवघ्या सातपुड्याचा उत्सव आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन व ग्रामस्थ, स्वयंसेवक अश्व शर्यत आयोजकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत उत्सवातील संभाव्य अनुचित प्रकारांवर वचक ठेवण्यासाठी यंदा ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करावा अशा सूचना‌ पोलिस प्रशासनाने दिल्या. त्यामुळे महिला-मुलींची छेडछाड व अवैध धंद्यांसह अन्य अवैध प्रकारांवर करडी नजर राहणार आहे.

सातपुड्यात नव्या वर्षातील उत्सवांना काठीच्या दसऱ्यापासूनच खऱ्या अर्थाने सुरुवात होते. त्यामुळे अवघ्या सातपुडा वासियांना काठीच्या दसरा उत्सवाची प्रतीक्षा होती. हा उत्सव तीन दिवसांवर आला असल्याने आदिवासी तयारीला लागला. तर काठीत होणाऱ्या अश्व शर्यतीसाठी महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातून घोडेस्वार व मालकांनी देखील अखेरचा सराव करुन घेत आहे. तसे पोलिस प्रशासनही सज्ज असून त्यांनी ग्रामस्थ, स्वयंसेवक अश्व शर्यत आयोजकांची संयुक्त बैठक घेतली.

बैठकीत सह.पोलिस अधीक्षक दर्शन दुगड, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा, पोलिस उपनिरीक्षक सागर गाडीलोहार, जितेंद्र पाडवी, हवालदार अरुण सैंदाणे, कॉ.राहुल महाले, दिनेश पावरा, सागर पाडवी, सी.के.पाडवी,संजय पाडवी, बहादुरसिंग पाडवी, करणसिंग पाडवी, गणपत सिंग पाडवी, गृहरक्षक कर्मचारी रवींद्र वसावे, रतन पाडवी, अमरसिंग पाडवी ,डॉ.जालमसिंग पाडवी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व वीज वितरणचे कर्मचारी उपस्थित होते.

कायदा व सुव्यवस्थ अबाधित ठेवा:- पावरा

दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काठी गावासह परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. परंतु पोलीस प्रशासनाला ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी सहकार्य करणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी काठीसह परिसरात कुठलेही अवैध धंदे व प्रकाराचा अवलंब न करता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे अशी अपेक्षा सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा
Previous Post

खोडाईमाता यात्रेत धारदार शस्त्र घेऊन फिरत होता युवक, तेवढ्यात ….

Next Post

भारताचा कोहिनूर हरपला, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 86 व्या वर्षी निधन

Next Post
भारताचा कोहिनूर हरपला, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 86 व्या वर्षी निधन

भारताचा कोहिनूर हरपला, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 86 व्या वर्षी निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add