Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवरात्रोत्सव : भगवा ध्वज मशालधारी बालिका व युवतींचे कुंकुम तिलक

team by team
October 7, 2024
in सामाजिक
0
नवरात्रोत्सव : भगवा ध्वज मशालधारी बालिका व युवतींचे कुंकुम तिलक

नंदुरबार l प्रतिनिधी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या दुर्गा माता दौडचे बालवीर चौकात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे पुष्पवृष्टीसह औक्षण करून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महिला सुवासिनीं तसेच युवतींनी भगवा ध्वज आणि मशालधारी बालिका व युवतींचे औक्षण करत कुंकुम तिलक केले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त शहरातीलु प्रमुख मार्गावरून दुर्गा दौडचे आयोजन करण्यात येते. यंदा रविवारी चौथ्या माळेच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापासून दुर्गादौडला प्रारंभ झाला. अग्रभागी मशाल व भगवा ध्वज हातात घेऊन फेटे परिधान केलेल्या बालिकांनी लक्ष वेधून घेतले.

त्यांच्या सोबत पांढरे वस्त्र, पांढरी टोपी, भगवा ध्वज हातात घेऊन जय श्रीराम… जय मातादी… वंदे मातरमच्या घोषणा देत धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय प्रभू श्रीरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमा हातात घेऊन युवक सहभागी झाले होते.

दुर्गा दौड छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापासून मोठा मारुती मंदिर, कुंभारवाडा, गवळी वाडा, नवनाथ नगर, नवा भोईवाडा मार्गे बालवीर चौकात पोहोचले. या ठिकाणी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे आकर्षक रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील सुहासिनी महिला व युवतींनी भगवा ध्वज आणि धारकरींचे औक्षण करून पूजन केले. दुर्गा माता दौड स्वागत कार्यक्रमाचे संयोजन शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे,जी. एस.गवळी, संभाजी हिरणवाळे, विशाल हिरणवाळे, गोपाल गवळी आदींनी स्वागत केले.

आरतीनंतर दौडचा समारोप
खोडाई ( खोडियार ) माता मंदिरात आरती होऊन दुर्गा दौडचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे, सौ. सुनिता हिरणवाळे, पत्रकार जगदीश ठाकुर, सौ. रोहिणी ठाकूर, श्रीमती चंदनबाई ठाकूर, छायाचित्रकार नितीन पाटील हे आरतीचे यजमान होते. वंदे मातरम गीताने दुर्गा दौडचा समारोप करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

आयुष्यभर समाज प्रबोधन करणाऱ्या वृद्ध साहित्यिक, कलावंतांच्या शासन सदैव पाठीशी :डॉ. विजयकुमार गावित

Next Post

नंदुरबारात आज लोककला महोत्सवाचे आयोजन, बालकलाकारांमध्ये होणार लोककलेचा प्रचार व प्रसार

Next Post
नंदुरबारात आज लोककला महोत्सवाचे आयोजन, बालकलाकारांमध्ये होणार लोककलेचा प्रचार व प्रसार

नंदुरबारात आज लोककला महोत्सवाचे आयोजन, बालकलाकारांमध्ये होणार लोककलेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add