अक्कलकुवा l प्रतिनिधी-
अक्कलकुवा पोलिसांची दमदार कारवाई करीत मोरंबा रस्त्यावरील शेलटापाणी गावाजवळ इनोव्हा कारसह अवैध विदेशी मद्य जप्त केले आहे.
अक्कलकुवा पोलीस स्टेशन जवळून दि. 4 ऑक्टोंबर रोजी 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास इनोव्हा गाडी ( क्र. जी.जे.26, ए.3363) वरील चालक हिमंतसिंग पावरा हा भरधाव वेगाने अक्कलकुवा पोलिस स्टेशन जवळून जात असताना पोलीस प्रशासनाने संबधित गाडीचा पाठलाग करून मोरंबा रस्त्यावर शेलटापाणी गावाजवळ पकडले असता त्या गाडीत अवैद्य मद्य रॉयल ब्लु कंपनीचे 48 बॉक्स मिळून आले. सदर ड्रायव्हर हिमंतसिंग पावरा याला ताब्यात घेण्यात आले आहे.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सदर कारवाईत 5 लाख 76 हजार रुपये किमतीच्या अवैध विदेशी मद्य रॉयल ब्लु कंपनीचे 48 बॉक्स, 7 लाख रुपये किंमतीची इनोव्हा कार, 15 हजार रुपये किमतीच्या एक मोबाईल फोन असा एकूण 12 लाख 91 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा आदेशानुसार अप्पर अधीक्षक आशित कांबळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, असई गुमानसिंग पाडवी, पो.ह. किशोर वळवी, पो.ह.अतुल गावित, पो.ह. संजय सूर्यवंशी, पो.ना. सुनील पवार, पो.शि. आदिनाथ गोसावी यांनी कार्यवाही केली आहे.