नंदुरबार l प्रतिनिधी-
कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक-युवतींना व्हावा. या दृष्टीकोनातून नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना केली जात आहे. जिल्ह्यातील 15 महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या या केंद्रांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 ला ऑनलाईन उद्घाटन सोहळा होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील महिला मंडळ संचलित शहादा कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (शहादा), महाराज जे.पी. वळवी कला, वाणिज्य व व्ही. के. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय (धडगाव), महात्मा फुले एम एस डब्ल्यु व मातोश्री जवेरीबेन मोतीलाल तूरखीया बी.एस. डब्ल्यू महाविद्यालय (तळोदा), जे.जी. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय (नंदुरबार), के.डी. गावित. बी.एस. सी. नर्सिंग महाविद्यालय (पथराई ता. नंदुरबार), के.डी. गावित फिजिओथेरपी महाविद्यालय (पथराई ता. नंदुरबार), वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (शहादा),
वेलीमाता कनिष्ठ महाविद्यालय ( वेली ता. अक्कलकुवा), श्री. काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (नंदुरबार), जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय (नंदुरबार), आदिवासी सेवा सहायक आणि शिक्षण प्रसारक संस्था, वरिष्ठ महाविद्यालय (नवापूर), जिजामाता शैक्षणिक संस्था, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (नंदुरबार), पी.एस.जी.व्ही.पी
मंडळ डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय (शहादा), ग्राम विकास संस्था कला महाविद्यालय (बामखेडा ता शहादा), रूलर फॉउंडेशन शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय (सोरापाडा ता. अक्कलकुवा) अशा एकूण 15 महाविद्यालयांची निवड करण्यात आली आलेली आहे.
महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून, त्यासाठी जास्ती जास्त उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा तसेच 20 सप्टेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास संबंधित महाविद्यालयांच्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहून उद्घाटन सोहळा पार पाडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.