नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी, नागरिकांनी गणेशमुर्तींचे विर्सजन करतांना दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जिल्ह्यात 7 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत सर्वत्र गणेशोत्सव साजरा होणार असून या कालावधीत गणेशोत्सव मंडळ, नागरिक यांच्याकडून श्री गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात येत असते. यावर्षी जिल्ह्यात व राज्यात जास्त प्रमाणात पाऊस झालेला असल्याने सर्व नद्या, नाले यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे व पाण्याचा प्रवाहही जास्त आहे. जिल्ह्यातील नद्या, उपनद्या,
नाले यांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेले आहे. त्यामुळे सर्वांनी सर्वोतोपरी काळजी घ्यावी. श्रीगणेश विसर्जन हे कृत्रिम तलावाच्या ठिकाणी करण्याची कार्यवाही करावी व प्रशासनास सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी श्रीमती सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.