Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या भव्य शिबिरात अडीच हजारहून अधिक वृद्धांनी योजनेसाठी केली नोंदणी

team by team
August 30, 2024
in राजकीय
0
मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या भव्य शिबिरात अडीच हजारहून अधिक वृद्धांनी योजनेसाठी केली नोंदणी

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार मतदार संघातल्या जास्तीत जास्त वयोवृद्ध लोकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा आणि वयोश्री योजनेचा लाभ देता यावा म्हणून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या भव्य नोंदणी शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला आणि चक्क अडीच हजार हून अधिक वृद्धांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून योजनेसाठी आपल्या नावाची नोंदणी केली.

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार डॉ.हिना गावीत यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिराप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते कांतीलाल टाटिया, भाजपा तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, तहसीलदार कुलथे, समाज कल्याण अधिकारी सुंदरसिंग वसावे व अन्य उपस्थित होते. माजी नगरसेवक संतोष वसईकर, कोपर्लीचे सरपंच विनोद वानखेडे, भागसरीचे उपसरपंच योगेश गिरासे, राहुल निकम, जगदीश पाटील यांनी मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.

 

तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या तीर्थ दर्शन योजनेचा तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शरीराने पार थकलेल्या वृद्ध महिला आणि पुरुषांनी प्रचंड गर्दी करून नोंदणी केली हे या शिबिराचे मोठे वैशिष्ट्य ठरले. छत्रपती शिवाजी नाट्य मंदिराचा परिसर आज वृद्ध महिला पुरुष यांनी फुलून गेलेला दिसला.

 

याप्रसंगी प्रमुख भाषणातून संसद रत्न माजी खा. डॉक्टर गावित यांनी सांगितले की, महायुतीचे राज्य सरकार प्रत्येक घटकाला आणि प्रत्येक समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध योजना लागू करीत आहे. लाडकी बहीण योजना राबवून महिलांना न्याय दिला त्याचबरोबर लाडका भाऊ योजना लागू करून बेरोजगार तरुणांना सुद्धा संधी दिली.

 

 

कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून त्यांच्या शेतात चालणाऱ्या वीज पंपाचे बिल माफ करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित हे स्वतः त्या सर्व योजनांचा लाभ नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांना करून देण्यासाठी सदैव कार्यरत असून नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील सुमारे एक लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ आपण मिळवून दिला.

 

नंदुरबार मतदार संघातल्या जास्तीत जास्त वयोवृद्ध लोकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा आणि वयोश्री योजनेचा लाभ देता यावा म्हणून आज आपण भव्य नोंदणी शिबिर घेतले. वैयक्तिक आणि सामूहिक लाभ देणारे असे काम आपण यापुढेही करत राहू असे मी अभिवचन देते, असेही डॉक्टर हिना गावित म्हणाल्या. तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी योजनांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याबद्दल टीका केली आणि जास्तीत जास्त वृद्धांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

जय बजरंग व्यायाम शाळेची दहीहंडी उत्साहात

Next Post

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर पेसा भरतीबाबतचे आंदोलन स्थगित

Next Post

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर पेसा भरतीबाबतचे आंदोलन स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add