नंदुरबार l प्रतिनिधी
येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी सामुहिकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तीक कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे पदाधिकार्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्याकडे लेखी स्वरुपात राजीनामा पत्र पाठविले आहे. यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष विजय मराठे, शहराध्यक्ष, विद्यार्थी प्रदेश संघटक गजानन कदमबांडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष अमित शेवाळे, देवेंद्रसिंग राजपुत, तालुकाध्यक्ष गौरव महिरे, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष जयवंत मोरे, राहुल जगदेव विद्यार्थी शहादा शहराध्यक्ष अथर्व पाटील, विद्यार्थी शहादा तालुकाध्यक्ष संकेत पाटील, विद्यार्थी नंदुरबार तालुकाध्यक्ष अनमोल पाडवी, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष राधेश्याम शिंदे, जिल्हा सरचिटणीस भरत खैरनार,
नंदुरबार शहर उपाध्यक्ष लाला बागवान, शहर कार्याध्यक्ष कालु शहा, शहर संघटक जितेंद्र ठाकरे, शहर सचिव गणेश मराठे, रोहित दाणेज, कार्यकारीणी सदस्य विजय मोरे, तालुका उपाध्यक्ष नागेश पवार, मयुर मोरे, तालुका कार्याध्यक्ष गणेश मराठे, तालुका संघटक अक्षय सामुद्रे, तालुका सहसंघटक प्रसाद पाटील, तालुका सचिव सागर सरोज, तालुका सहसचिव विशाल महाले, कार्यकारीणी सदस्य मुकेश सामुद्रे, तुषार सामुद्रे आदींचा समावेश आहे.