नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील रद्द असलेल्या व राजीनामा दिलेल्या, रास्तभाव दुकानांसाठी नवीन परवाना मंजूर करण्यात येणार असून इच्छुकांनी नवीन परवान्यासाठी अर्ज सादर करावे असे आवाहन, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
नंदुरबार तालुक्यात शहारातील पोलीस फुडस ग्रेन, बामडोद व ओझर्दे. अक्कलकुवा तालुक्यात वडली, जुना नागरमुठा, भोयरा, रेथी व डाब-1. शहादा तालुक्यात कमखेडा व लोणखेडा. नवापूर तालुक्यात बालआमराई, गंगापूर, बोरचक व वऱ्हाडीपाडा असे जिल्ह्यात एकूण 14 दुकानांसाठी नवीन परवाने देण्यात येणार आहेत.
नवीन परवान्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2024 पर्यंत असून रास्तभाव दुकान मंजुरीसाठीचे नियम, अटी व शर्ती इत्यांदीसह सविस्तर जाहिरनाम्याची प्रत संबंधीत तहसिल कार्यालय व जिल्हा पुरवठा कार्यालय नंदुरबार येथे तसेच जिल्ह्याच्या www.nandurbar.nic.in या संकेतस्थळवर उपलब्ध आहे.