नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील थुवा येथील शेतकऱ्याकडून शेततळ्यासाठी अनुदान मिळवून देण्यासाठी २० हजाराची लाच मागणाऱ्या मंडळ कृषी अधिकाऱ्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नवापूर तालुक्यातील थुवा येथे तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे शेत आहे.शेत सर्वे नंबर ९५/१/अ या शेतात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधण्याची मंजुरी मिळाली होती. सदर शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम मिळवून – देण्यासाठी सागर अशोक अहिरे (वय ३३) मंडळ कृषी अधिकारी ( वर्ग तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नवापूर ) रा. प्लॉट नं १०, रूपाइ नगर, पेरेजपूर रोड, साक्री यांनी शेतकऱ्याकडून २० फेब्रुवारी २०२४ रोजी २५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 29 जून रोजी सागर अहिरे यांच्या रात्री नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक समाधान वाघ यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले, यावेळी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोहवा विजय ठाकरे, पोहवा विलास पाटील, पोना देवराम गावित, पोना हेमंत कुमार महाले, पोना सुभाष पावरा यांच्या पथकाने ही कारवाई केली.