नंदुरबार l प्रतिनिधी
येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनासह गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराने विद्यार्थी भारावून गेले.
बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले. वीरशैव लिंगायत गवळी समाजातील वावद येथील के. डी. गावित विद्यालयाचा विद्यार्थी जयेश गोपाल गवळी (लगडे) याने इयत्ता दहावी परीक्षेत 83 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या बद्दल जयेश गवळी याचा पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले की, पितृछत्र हरपल्यानंतरही जिद्द आणि चिकाटीने परिश्रम घेऊन जयेश गवळी या विद्यार्थ्याने दहावी परीक्षेत यश संपादन केले. त्याचप्रमाणे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सर्वांनी आदर्श घेणे गरजेचे आहे. असे देसले यांनी सांगितले.
याप्रसंगी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे जयेश गवळी यास सन्मानपत्र आणि पुस्तक संच भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे आणि ज्येष्ठ सल्लागार जी. एस. गवळी यांनी केले. या कार्यक्रमास बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि उद्योजक राजू खानवाणी, ॲड.निलेश देसाई, नंदुरबार नगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरातील कर्मचारी पांडुरंग गवळी (यादबोले ), नटेश्वर विद्यालयाचे उपशिक्षक भरत गवळी, के. डी. गावित विद्यालयाचे शिक्षक महेंद्र पाटील, सागर पाटील, वावद येथील पोस्टमन भटू लगडे, राजेंद्र लगडे, प्रकाश लगडे, नंदुरबार गवळी समाजाचे मनोहर बारसे, आनंदा घुगरे, संभाजी हिरणवाळे, राहुल पाटील, शैलेंद्र माळी, विशाल हिरणवाळे,आदी उपस्थित होते .