Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साक्री तालुक्यातही महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या भव्य मिरवणुकांनी व्यापले रस्ते

team by team
May 7, 2024
in राजकीय
0
साक्री तालुक्यातही महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या भव्य मिरवणुकांनी व्यापले रस्ते

नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यात मोलगी येथे काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीची आणि भव्य प्रचार सभेची चर्चा थांबते न थांबते तोच साक्री तालुक्यातील गावांमधून देखील महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या जोरदार प्रचार फेऱ्या आणि निघालेल्या भव्य मिरवणुकांनी आजचा दिवस गाजवला.

 

लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खा. डॉ. हिनाताई गावित यांनी 6 मे 2024 रोजी साक्री तालुक्यातील निजामपुर जैताणे, पिंपळनेर आणि साक्री यांसह लहान मोठ्या गावात प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क केला.

 

भर उन्हात गाव अन गाव पिंजून काढले. उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या समवेत अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी या प्रचार फेरीचे नेतृत्व केले. याप्रसंगी साक्री येथील नगराध्यक्ष जयश्री पवार, हर्षवर्धन दहिते, जिल्हा परिषद सदस्य खंडू आप्पा कुवर, जिल्हा परिषद सदस्य सुनेत्रा साहेबराव गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, संजय अहिरराव, पंचायत समिती सदस्य मनोज जगताप, उषा पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित, भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत घरटे, मंडळ अध्यक्ष विकी कोकणी, सरचिटणीस सुरेश शेवाळे, योगेश भामरे, शहराध्यक्ष राकेश साहेबराव, प्रवीण राऊत, सचिन शेवाळे, सचिन देसले, तुषार घरटे यांच्यासह त्या भागातील विविध गावाचे सरपंच उपसरपंच कार्यकर्ते आणि महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

मतदारांनी वारंवार संधी देऊन सुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही, ते काँग्रेस नेते खोटं बोलून लोकांची दिशाभूल करीत आहे आणि आता आरक्षण संविधान आणि त्यासारखे मुद्दे घेऊन पुन्हा मतं मागायला येत आहेत. खोटारडेपणा करून दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्यांना जागा दाखवा; अशा शब्दात महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी मतदारांशी संवाद साधला. प्रचार फेरी दरम्यान महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांचे प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. जागोजागी महिलांनी औक्षण करून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. काही वसाहतींमध्ये थांबून डॉ. हिना गावित यांनी मतदारांशी विशेषतः महिलांशी संवाद केला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मला अभिमान- उध्दव ठाकरे

Next Post

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता

Next Post
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add