Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतूसांसह दोघांना अटक

team by team
May 7, 2024
in क्राईम
0
गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतूसांसह दोघांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा पोलीसांची लोणखेडा जवळ दोन जिवंत काडतूसांसह दोघांना अटक केली असून गावठी पिस्तुलही जप्त करण्यात आली आहे.

शहादा गावातील दराफाटा कडुन लोणखेडा मार्गे दोन इसम हे एका विना नंबरच्या काळया रंगाच्या पल्सर मोटर सायकलवर त्यांचे कब्जात विनापरवाना/अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगून शहादा कडे येत असल्याची गोपनीय माहिती शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाल्याने श्री. बुधवंत यांचे सुचनांनुसार शहादा पोलीस ठाण्यातील पोउपनि-प्रविण कोळी व स्टाफ अशांनी बातमीची सत्यता पडताळण्यासाठी लोणखेडा ता. शहादा येथे गेले.

 

त्याठिकाणी लोणखेडा गावात चाररस्ता परिसरात शहादा पोलीस स्टाफ दबा धरुन बसले असतांना मिळालेल्या बातमी प्रमाणे दराफाटा कडून दोन इसम हे एका काळया रंगाच्या पल्सर मोटार सायकलने येऊन लोणखेडा चाररस्ता चौफुलीवर 15.50 वाजेचे सुमारास थांबले असता सदर ठिकाणी शहादा पोलीसांनी त्यांना थांबवून विचारपूस करता वाहन चालविणा-या इसमाने त्याचे नाव राहूल ऊर्फ रणजित राजेश पथरोड, रा.निवाली रोड, सरकारी दवाखान्याजवळ, सेंधवा, जि.बडवाणी, राज्य- मध्यप्रदेश व मागे बसलेल्या इसमाने त्याचे नाव पवन बन्सीलाल पाटील रा. निंबार्क कॉलनी, गल्ली नं.-2, सेंधवा, जि.बडवाणी, राज्य मध्यप्रदेश असे सांगितले.

 

सदर व्यक्तीची अंगझडती घेता त्याचे जवळ एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन (जिवंत काडतूस) राऊंड विनापरवाना स्वतःचे कब्जात बाळगत असल्याचे मिळून आले. त्यानुसार सदर दोनही इसमांना ताब्यात घेण्यात येऊन शहादा पोलीस ठाणे येथे गुरनं. 319/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 सह महा. पोलीस कायदा कलम 37 (1) (3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शश्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा सदाशिव वाघमारे (अति. कार्यभार शहादा) यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक प्रविण कोळी, असई/प्रदीपसिंग राजपूत, पोलीस नाईक घनश्याम सुर्यवंशी, योगेश थोरात, पोलीस शिपाई मुकेश राठोड, दिनकर चव्हाण, भरत उगले, योगेश माळी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुक्यात दुसऱ्या दिवशी गोवाल पाडवींचा झंझावाती प्रचार दौरा

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मला अभिमान- उध्दव ठाकरे

Next Post
नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मला अभिमान- उध्दव ठाकरे

नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मला अभिमान- उध्दव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add