शहादा l प्रतिनिधी
पूज्य सानेगुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहादा येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर टाॅवर चॅलेंज काॅम्पिटीशनचे आयोजन करण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील पूज्य सानेगुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर टाॅवर चॅलेंज काॅम्पिटीशनचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तंत्रनिकेतनचे प्राचार्य बी. के. सोनी, प्रा. हरिष के.चव्हाण हे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत प्रथम वर्षाच्या विविध शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींनी भाग घेतला. या टेक्निकल इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पेपर टॉवर बनवले. या उपक्रमाचा उद्देश असा की, विद्यार्थ्यामध्ये टीमवर्क, प्रॉब्लेम सॉलव्हींग स्किल्स्, किएटीव्हीटी असे विविध प्रकारचे ज्ञान त्यांना आत्मसात झाले पाहिजे.
या पेपेर टॉवर्सचे तज्ञांकडुन परिक्षण करण्यात आले.त्यानंतर प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. आय. टी. पाटील व प्रा. वाय. ओ. पाटील यांनी परिश्रम घेतले. सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदिश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयुरभाई दिपक पाटील, प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आर. एस. पाटील, कुलसचिव बी. आर. पाटील, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर वृंदानी अभिनंदन केले.