नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्का वाढवा यासाठी विविध जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात येत आहे.
नंदुरबार येथील नगरपालिका येथे स्विप कार्यक्रमांतर्गत मताधिकार हा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजवणारच या संदर्भातल्या स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल, सोबत जयसिंग गावित, राजेश परदेशी, दीपक पाटील. यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मतदान करण्यासंदर्भात सर्वांनी स्वाक्षरी केली व पालिकेत येणाऱ्या नागरिकांकडून देखील स्वाक्षरी करून घेण्यात आली.








