म्हसावद l प्रतिनिधी
पाडळदा ते बुडीगव्हान रस्त्यावर दोन मोटरसायली यांची समोरासमोर धडक होऊन चार जण जागीच ठार झाले. याबाबत शहादा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,बुडीगव्हान ते पाडळडा रस्त्यादरम्यान समोरासमोर मोटारसायकल ची धडक होऊन चार जण ठार त्यात दोन जण वयोवृद्ध तर दोन जण तरुण होते.अपघात एवढा भीषण होता की एक मोटर सायकल जागीच जाळून खाक झाली.
एका मोटरसायकल वर उखड्या सुपा पवार (वय ६९ ) रा. टवळाई ता.शहादा व लतीफ शेख नबी खाटीक (६५) रा. इस्लामपूर ता शहादा तर दुसऱ्या गाडीवर स्वराज सुरेश ठाकरे (वय २३) रा.फत्तेपुर ता. शहादा व आतिष दशरथ बर्डे वसई (२०) रा.उमरटी ता शहादा या तरुणांचा समावेश आहे.
अपघात एवढा भीषण होता की चार ही जण जागीच ठार झाले.अपघाताची महिती समजताच अपघाती स्थळी शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, म्हसावद चे सपोनि राजन मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
चार ही जणांना म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले.मयतावर डॉ.अल्लाउद्दीन शेख यांनी शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मृतांमध्ये उमरटी येथील पोलीस दशरथ बर्डे यांचा मुलगा आशीष दशरथ बर्डे तर इस्लामपूर येथील उपसरपंच लतीत खाटीक याचा समावेश आहे. ययाबाबत शहादा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.








