Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हनुमान जयंती निमित्त जिल्ह्यात 12 ठिकाणी सामूहिक गदापूजन

team by team
April 23, 2024
in सामाजिक
0
हनुमान जयंती निमित्त जिल्ह्यात 12 ठिकाणी सामूहिक गदापूजन

नंदुरबार l प्रतिनिधी
श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने जिल्ह्यातही 12 ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले.

 

नंदुरबार येथे श्री मोठा मारुती मंदिर येथे श्री मोठा मारुती मंदिर चे कार्याध्यक्ष अशोक चौधरी नंदुरबार येथील प्रसिद्ध उद्योगपती नितेश अग्रवाल तसेच सचिव कल्याण पाटील भास्कर मराठे यांच्या हस्ते गंदा पुजन संपन्न झाले.

 

या वेळी शंखनादाने कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्र, श्री हनुमान चालीसा, तसेच ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली.

 

 

या ‘गदापूजना’मागील भूमिका स्पष्ट करतांना हिंदु जनजागृती समितीचे सतीश बागुल म्हणाले की, युगानुयुगे मारुतीरायाचे शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते ती त्यांची ‘गदा’ ! याच दैवी गदेने मारुतिरायांनी अनेक बलाढ्य राक्षसांचा संहार करून प्रभु श्री रामचंद्रांच्या ‘रामराज्या’साठी मोठे योगदान दिले. महाभारताच्या युद्धात देखील अर्जुनाच्या रथावर विराजमान होऊन पांडवांना धर्मयुद्ध जिंकण्यात दैवी सहाय्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठीही समर्थ रामदास स्वामींनी ११ मारूतींची स्थापना करून मावळ्यांकडून बलोपासना करून घेतली.

 

 

आता पुन्हा अयोध्येत ५०० वर्षांनंतर एकदा श्रीरामलला विराजमान झालेले आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला मारुतीरायांप्रमाणे भक्तीची अन् शौर्याची आवश्यकता आहे. हाच उद्देश ठेऊन आज श्री हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वत्र ‘गदापूजनाचे’ आयोजन केले आहे.

 

गदापूजनाचे कार्यक्रम साठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.

बातमी शेअर करा
Previous Post

गाझा’साठी गुगलच्या कार्यालयात आंदोलन करणार्‍या २८ ‘गाझाप्रेमी’ कर्मचार्‍यांचे निलंबन

Next Post

डी.आर. हायस्कूलचा विद्यार्थी विद्यापीठात तिसरा

Next Post
डी.आर. हायस्कूलचा विद्यार्थी विद्यापीठात तिसरा

डी.आर. हायस्कूलचा विद्यार्थी विद्यापीठात तिसरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026
मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add