Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवार डॉ. हिना गावित यांची नामांकन दाखल करण्यासाठी निघणार भव्य रॅली

Mahesh Patil by Mahesh Patil
April 21, 2024
in राजकीय
0
महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवार डॉ. हिना गावित यांची नामांकन दाखल करण्यासाठी निघणार भव्य रॅली

नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीच्या तथा भाजपाच्या उमेदवार महा संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित या उद्या सोमवार दि.22 एप्रिल 2024 रोजी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील समस्त मतदार बंधू भगिनींना त्यानिमित्त करण्यात येणाऱ्या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

 

उमेदवार महा संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांची ही रॅली उद्या सोमवार दि.22 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या निवासस्थानापासून म्हणजे नंदुरबार येथील विरल विहार सोसायटीतील खोडाई माता रोड वरून काढण्यात येईल. महायुतीच्या आजी माजी आमदारांसह भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय भाऊ चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांच्यासह महायुती मधील सर्व मित्र पक्षांचे नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर, शहादा, शिरपूर आणि साक्री या आठही तालुक्यातील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे असे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

 

 

 

 

डॉक्टर हिना गावित यांची चमकदार कारकीर्द

महा संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी करीत आहे. याआधी 2014 या वर्षी त्यांनी प्रथमच लोकसभा निवडणूक लढविली होती आणि नंदुरबार लोकसभा मतदार संघातील प्रस्थापित काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढून निवडून येण्याचा विक्रम स्थापित केला. नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या रूपाने पहिला खासदार निवडून आला.

 

 

 

 

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात खासदार पदी निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला खासदार ठरल्या. खासदारकीच्या पहिल्या पाच वर्षात रेल्वे दुहेरीकरण, मोफत गॅस वाटप आणि तत्सम विक्रमी विकास कामांमुळे आणि मोदी सरकारच्या आदिवासी अभीमुख धोरणांमुळे त्यांची पहिली कारकीर्द लोकप्रिय ठरली. 2019 यावर्षी दुसऱ्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी पुन्हा मोदी लाटेसमवेतच त्यांनी केलेल्या कामांमुळे दुसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी स्थापन केला.

 

 

 

 

आदिवासी भागातून प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे या दुसऱ्या पंचवार्षिक कार्यकाळात खासदार डॉक्टर हिना गावित यांनी लोकसभेमध्ये विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भाषणे केली प्रश्न मांडले आणि मोदी सरकारमधील अभ्यासू खासदार अशी त्यांची प्रतिमा बनली. त्यांची कार्यपद्धती लक्षात घेऊन मोदी सरकारने जलजीवन मिशन आणि महिला सुरक्षा सारख्या राष्ट्रीय स्तरावरील विविध समित्यांचे प्रमुख पद सोपवले, विदेशातील अभ्यास दौऱ्यांची जबाबदारी आणि कार्यभार सोपवला. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिमा स्थापन झाली. दहा वर्षाच्या कारकिर्दीत खासदार डॉक्टर हिना गावित यांनी संसदीय अधिवेशनादरम्यान केलेली भाषणे मांडलेले प्रश्न आणि आदिवासी भागातील समस्यांवर उठवलेला आवाज लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने यंदा त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. सलग तीन वेळा निवडून येण्याची म्हणजे हॅट्रिक स्थापन करण्याची संधी मतदार त्यांना देतील का हे आता पुढे पाहायला मिळेल.

बातमी शेअर करा
Previous Post

पाच कुटुंबाभोवतीच फिरतय नंदुरबार जिल्ह्याचे राजकारण

Next Post

लोकसभा निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीकडून रवींद्र वळवी रिंगणात

Next Post
लोकसभा निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीकडून रवींद्र वळवी रिंगणात

लोकसभा निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीकडून रवींद्र वळवी रिंगणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025
डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

July 2, 2025
अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

July 2, 2025
नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group