नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने पायाभूत स्तरावर स्थानिक परिस्थिती यांचे विचार करून राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने आराखडा विकसित केला आहे.
शिक्षण विचारांची समज निर्माण होण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे उद्बोधन व्हावे म्हणून यासाठी जिल्हास्तरावर दोन दिवसांच्या प्रशिक्षणाचेआनंदी बालशिक्षण प्रशिक्षण शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने पायाभूत स्तरावर स्थानिक परिस्थिती यांचे विचार करून राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने आराखडा विकसित केला आहे शिक्षण विचारांची समज निर्माण होण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे उत्पादन व्हावे म्हणून जिल्हास्तरावर दोन दिवसांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाभरातील अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रशिक्षणाला उपस्थित होत्या.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार, महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांसाठी आनंदी बाल शिक्षण जिल्हास्तरीय प्रशिक्षण नंदुरबार येथील डीएसके रेसिडेन्सी या हॉटेलच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रवीण चव्हाण, महिला बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिदास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख, अधिव्याख्याता सुभाष वसावे यांनी या प्रशिक्षणाचे नियोजन केले.
या प्रशिक्षणासाठी चार सत्रांमध्ये पर्यवैक्षिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याअंतर्गत पहिल्या सत्रात सर्वांगीण बालविकास चित्राच्या माध्यमातून परिचय, दुसऱ्या सत्रात बालकांमध्ये काय साध्य करायचे त्याबाबत मार्गदर्शन करणारे दुसरे सत्र खेळ आणि खेळणी यावर आधारित शिक्षण तर तिसऱ्या सत्रात खेळण्याचा संग्रह असलेली जादूची पेटी हे महत्त्वाचे चर्चासत्र असणार आहे.
सुरक्षा आणि सुरक्षितता यातील शाळेतील जबाबदारीने हाताळणी करण्याची चर्चा या प्रशिक्षण सत्रात घडवून आणण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. बाबासाहेब बडे, नंदुरबार बाल विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री साईनाथ वंगारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दोन्ही अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर भाषणात शासनाने तयार केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार तळागाळातील अंगणवाडी केंद्रातील काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांपर्यंत सर्व विषय नेमके पोहचवून शिक्षणाच्या उदात्तीकरणाला सुरूवात करण्याचे आवाहन केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे विषय सहायक देवेंद्र बोरसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन केले.
जिल्हास्तरावर अधिव्याख्याता सुभाष वसावे, पर्यवेक्षिका श्रीमती अश्विनी करणके, श्रीमती सुनीता सोनवणे हे राज्य तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत.