नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
थोर भौतिक शास्त्रज्ञ डॉ. सी. वी. रमण यांनी भौतिक शास्त्रात रमण इफेक्ट चा शोध लावला होता त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील याच अमूल्य कार्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो ह्या निमित्ताने शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक निलेश पाटील, भूषण मोरे प्रमुख पाहुणे होते, तर शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या यावेळी उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षका वंदना जांभीलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, अविनाश सोनेरी, सुनीता पवार कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सी.पी.बोरसे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सी. वी. रमन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सुरुवातीला जानकी पाठक या विद्यार्थिनीने सी. व्ही रमण यांच्या स्कॅटरिंग ऑफ लाईट अर्थात रमन इफेक्ट याविषयी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली, तनिष्का बोधगावकर या विद्यार्थ्यांनी डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या विषयी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली, रिद्धेश नांद्रे प्रांजल वळवी पूजा साबळे दिव्या शेलार आणि साक्षी मराठी या विद्यार्थ्यांनी ‘अत्र,तत्र, सर्वत्र विज्ञान आपला मित्र’ ही सुंदर अशी नाटिका सादर केली या नाटिकेतून त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला की आपले जीवन हे विज्ञानाने व्यापलेले असून विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आपले जीवन अत्यंत सुखद झालेले आहेत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेत विज्ञान आहे हे या नाटिकेतून संदेश देण्यात आले,
त्यानंतर टेलिफोन चा शोध लावून अवघ्या जगाला जवळ आणणारे अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्या विषयी माहिती देण्यात आली आजच्या विज्ञान युगात वावरत असताना समाजात काही अंधश्रद्धा दिसून येतात ,अंधश्रद्धा दूर व्हाव्यात याकरता इयत्ता 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी ‘डोळे उघडुन बघा गड्यांनो’ हे गीत सादरीकरण केले, रिद्धेश नांद्रे या विद्यार्थ्यांनी मार्स ऑर्बिटल मिशन याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक मोटार निरीक्षक निलेश पाटील व भूषण मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन पुष्पा निकम यांनी केले.