Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवयवदान प्रक्रियेसाठी नंदुरबारला वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा होण्याची एकमुखी मागणी

team by team
February 7, 2024
in राज्य
0
अवयवदान प्रक्रियेसाठी नंदुरबारला वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा होण्याची एकमुखी मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
मानवी देह नश्वर असून मृत्यूनंतर देहातील अवयवांचे गरजूंना उपयोग व्हावा यासाठीच अवयवदान चळवळ राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हा निर्मिती होऊन 26 वर्ष झाली. मात्र अजूनही देहदान, अवयव दानासाठी धुळ्यासह पर जिल्ह्यात जावे लागते. म्हणून देहदान प्रक्रियेसाठी राज्य शासनाने नंदुरबार जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची एकमुखी मागणी नंदुरबार जिल्हा वासियांकडून होत आहे.

यासंदर्भात नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीचे समन्वयक महादू हिरणवाळे यांनी माहिती देताना सांगितले की, धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याची स्वतंत्र निर्मिती झाल्यानंतर सन 1998 ला नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून देहदान, नेत्रदान, अवयवदान यासाठी जनजागृती आणि प्रबोधन चळवळ उभी करण्यात आली. गेल्या 26 वर्षाच्या कालखंडात सुद्धा दात्यांच्या परिवारातून आतापर्यंत 137 नेत्रदान, चार देहदान, आणि दोन दात्यांचे किडनी दान झाले आहे. यापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नाते वाईकांनी नेत्रदानची इच्छा व्यक्त केल्यास संभाजीनगर (औरंगाबाद) या ठिकाणी जावे लागत होते.

कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सहा तासाच्या आत त्यांचे नेत्रदान प्रक्रिया होणे आवश्यक असते. मात्र नंदुरबार ते संभाजी नगर अंतर जास्त असल्याने या प्रक्रियेसाठी अडचणी निर्माण होत असे. त्यानंतर नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीने आरोग्य विभागाशी सातत्याने प्रयत्न करून धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात प्रक्रियेसाठी प्रयत्न केले. येथे अनेक नेत्रदान करणे सोयीचे झाले. त्यानंतर पुन्हा दोंडाईचा येथील रोटरी आय हॉस्पिटल येथे सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ आणि अंतर कमी झाले. नेत्रदान, देहदान आणि अवयवदान प्रक्रिया सुलभ, सोपी व्हावी यासाठी नंदुरबार येथे नव्याने निर्मित झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी आहे.

नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समिती नेत्रदान प्रबोधन चळवळीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत यात अध्यक्ष म्हणून डॉ. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष सुरेश जैन, सचिव डॉ. अर्जुन लालचंदाणी, समन्वयक महादू हिरणवाळे, श्रीराम दाऊतखाणे, कार्यरत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

रासेयोतर्फे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात नेत्र तपासणी शिबिर

Next Post

स्वा.सै.श्री.गोकुळदास देसाई आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add