नंदुरबार l प्रतिनिधी
धुळ्याहून नंदुरबारकडे जात असताना चिमठाणे येथे आज दि.5 फेब्रुवारी दुपारी 2 वाजे दरम्यान रितूची वाहतूक करणाऱ्या वाळूच्या डंपरने धडक दिल्याने भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.
भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचा धुळे येथे भारतीय जनता पार्टीची लोकसभा क्लस्टर विस्तारक बैठकीसाठी नंदुरबारहुन सकाळी 8 वाजता धुळ्याकडे रवाना झाले होते. धुळे येथील चंद्रदीप रेजन्सी सुरत बायपास रोड येथे होती. बैठक पार पडली. लोकसभा क्लस्टर विस्तारक बैठकीनंतर दुपारी नंदुरबारकडे जात असताना चिमठाणा जवळ अशोक लेलँड कंपनीच्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही.