नंदुरबार l प्रतिनिधी
पोक्सो कायदयान्वये आरोपितास जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अधिक माहिती अशी की, विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील राहणा-या फिर्यादी यांची 8 वर्षीय पिडीत बालिका हिस चुलत काका याने पिडीत बालिकेची आई शेतात गेल्याचे संधी साधून पिडीत बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाणेत भा.द.वि.क.-376(अ)(ब),376(2)( फ) अन्वये सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 प्रमाणे गुन्हयातील आरोपी (पिडीतेचा काका) याचे विरुध्द गुन्हा नोंदविला होता. व सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी यास तात्काळ अटक करण्यात आली होती.
विसरवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सदरचा गुन्हयाचा तपास पोउपनि-भुषण बैसाणे यांचेकडेस दिला. पोउपनि- भुषण यांचेकडेस दिला. पोउपनि- भुषण बैसाणे व त्यांचे सहकारी पोलीस यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी याचे विरुद् मुदतीत दोषारोपपत्र अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-2, नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-2, नंदुरबार यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीत बालिका वय-8 वर्षे, पिडीत बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्याआहेत. यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-2, नंदुरबार यांनी आरोपीतास भा.द.वि.क.-376 अन्वये दोषी ठरवत दहा वर्ष सश्रम कारावास व रुपये 5000/- दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 प्रमाणे दोषी ठरवत दहा वर्ष सश्रम कारावास व रुपये 5 हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता ॲड.बी.यु.पाटील यांनी काम यांनी पाहिले होते. तसेच पैरवी अधिकारी पोउपनि- राहुल भदाणे, पैरवी अंमलदार पोहेकॉ 170 नितीन साबळे व पोना 947 गिरीष पाटील यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.