नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग म्हणून इयत्ता पाचवी ते दहावी च्या 27 वर्गातून प्रत्येकी एक विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री पदी नेमणूक करण्यात आली.त्या 27 मुख्यमंत्र्यांनी तीन उमेदवार पंतप्रधान पदासाठी उभे होते त्यांना मतदान केले.
प्रधानमंत्री पदासाठी सार्थक बजरंग पवार, कौशिक वासुदेव चौधरी, कुणाल कमलेश पाटील हे विद्यार्थी उभे होते यापैकी सार्थक बजरंग पवार याची प्रधानमंत्री पदी निवड झाली.
या निवडणुकीसाठी शाळेमध्ये आदर्श बूथ बनवण्यात आले होते.
सदर बुथचे उद्घाटन नायब तहसीलदार नितीन पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले..
या अनुषंगाने शाळेत पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आले होते.. यावेळी विविध वृत्तवाहिन्यांचे छायाचित्रकार व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.
पत्रकार परिषदेतून अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मुख्याध्यापक यांनी समर्पक उत्तरे दिली.
तसेच यावेळी 1981च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला एलसीडी प्रोजेक्ट व स्क्रीन भेट दिली तसेच प्रत्येक वर्गासाठी 27 पंखे भेट दिले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन ॲड.परीक्षित मोडक, अध्यक्ष नरेंद्रभाई सराफ,संस्थेचे सचिव प्रशांत पाठक,ज्येष्ठ कार्यकारणी सदस्य आबासाहेब टेंभेकर,राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक पंकज पाठक, ज्यु.कॉलेजचे उपप्राचार्य मोहन अहिरराव,उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक,पर्यवेक्षक विपुल दिवाण,हेमंत खैरनार तसेच सर्व शिक्षक सहकारी उपस्थित होते.