नंदुरबार l प्रतिनिधी
खान्देश अवयवदान प्रबोधन रथयात्रेचे बुधवारी नंदुरबार जिल्ह्यात आगमन होत आहे. या महादान (नेत्रदान, त्वचादान, अवयव दान, देहदान) प्रबोधन रथयात्रेला धुळे येथून प्रारंभ होणार असून ही यात्रा साक्री, पिपळनेर मार्गे बुधवारी नंदुरबार जिल्ह्यात येणार आहे. नंदुरबारसह शहादाा, तळोदा येथे अवयवदाना संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्हा सार्वजनिक अवयवदान समितीचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील,उपाध्यक्ष सुरेश जैन, सचिव डॉ. अर्जुन लालचंदाणी, सदस्य महादू हिरणवाळे, श्रीराम दाऊतखाने, डॉ. वडाळकर, विजय पाटील, कैलास मराठे आणि सदस्यांतर्फे नंदुरबार जिल्ह्यात तालुका निहाय प्रबोधन रथयात्रेचे संयोजन केले आहे.
7 फेब्रुवारी रोजी प्रबोधन रथयात्रेचे नंदुरबार जिल्ह्यात आगमन होईल. रात्री मुक्कामानंतर। 8 फेब्रुवारी रोजी नंदुरबार ते तळोदा प्रस्थान स. 8 वाजता तळोदाहुन स. 9 वाजता कार्यक्रमासाठी वेळ स.9 ते दुपारी 12 तळोदा ते शहादा कार्यक्रमासाठी वेळ दुपारी 3 ते संध्या.7 फेडरेशनफेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई या महाराष्ट्रात नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान या विषयी सर्वांगाने कार्य करणाऱ्या संस्थेच्या विद्यमाने येत्या 5 ते 13 फेब्रुवारी 2024 दरम्यान खान्देश विभागात प्रबोधन रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या महादान (नेत्रदान, त्वचादान, अवयव दान, देहदान) प्रबोधन यात्रेला धुळे येथून प्रारंभ होणार असून ही रथयात्रा साक्री, पिंपळनेर, नंदुरबार, तळोदा, शहादा, दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूर, चोपडा, अंमळनेर व जळगाव या ठिकाणांहून मार्गक्रमण करणार आहे. फेडरेशनतर्फे आतापर्यंत राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या विभागातून चार पदयात्रांचे आयोजन करून त्या माध्यमातून 3700 किलो मीटर महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये जनप्रबोधनाचे कार्य आहे. हि प्रबोधन रथयात्रा फेडरेशनने ‘रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊन’ या संस्थेबरोबर संयुक्तपणे आयोजित केली आहे.
या नियोजित महायात्रेच्या मार्गावरील गावे, महत्त्वाची ठिकाणे किंवा शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रभात फेरी व प्रबोधनपर व्याख्याने व सादरीकरणे यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन होणे आवश्यक असून त्याकरीता स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभाग व योगदान या महत्त्वाच्या बाबी असणार आहेत. खानदेशात स्थानिक पातळीवर आरोग्य, देहदान, नेत्रदान, त्वचादान, अवयव दान आदी क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी ही महादान प्रबोधन यात्रा यशस्वी करण्यास सहकार्य करून एका पवित्र कार्यास हातभार लावावा असे आवाहन फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनतर्फे करण्यात आले आहे. सर्व इच्छूक कार्यकर्त्यांनी कृपया फेडरेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार (९८२२०४९६७५), उपाध्यक्ष सुनील देशपांडे(९६५७७०९६४०), सहसचिव प्रशांत पागनीस (८५३००८५०५४) यांच्याशी मोबाईल व्हाट्सअपवर किंवा ईमेल वर संपर्क करावा
organdonationfed@gmail.com
federation@organdonation.net.in








